जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बिपाशा बासूनं पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये केला रोमान्स, KISS करतानाचे फोटो व्हायरल

बिपाशा बासूनं पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये केला रोमान्स, KISS करतानाचे फोटो व्हायरल

बिपाशा बासूनं पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये केला रोमान्स, KISS करतानाचे फोटो व्हायरल

अभिनेत्री बिपाशा बासू सध्या तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी : अभिनेत्री बिपाशा बासू सध्या तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिनं या व्हेकेशनचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर हे कपल रोमँटीक अंदाजात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. याशिवाय बिपाशानं करणच्या वाढदिवसाचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये करणला किस करताना दिसत आहे. करण सिंग ग्रोवरनं रविवारी 23 फेब्रुवारीला 38 वाढदिवस साजरा केला. या निमित्त हे दोघंही मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. यावेळचे काही फोटो या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये हे दोघंही स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना बिपाशानं लिहिलं, ‘माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देणाऱ्या पार्टनरसोबत मी माझं आणखी एक व्हेकेशन एन्जॉय केलं…’ बिपाशा आणि करणचा हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. क्रिकेटपटूशी लग्न करणार का? या प्रश्नावर पहिल्यांदाच अनुष्कानं दिलं उत्तर बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांनी 30 एप्रिल 2016 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाला जवळपास 4 वर्षं पूर्ण झाली आहेत. बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. या आधी त्याचे 2 वेळा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर बिपाशानं एकाही बॉलिवूड सिनेमात काम केलेलं नाही. त्यामुळे तिच्या कमबॅकी तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, 46 दिवसांनंतर एवढी आहे कमाई

जाहिरात

बिपाशाशी लग्न करण्याआधी करणनं त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटला घटस्फोट दिला होता. जेनिफर आणि करणच्या घस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कारण टीव्ही वरील ही सर्वात लोकप्रिय जोडी होती. यानंतर लगेच 2016 मध्येच करण तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला. त्यानं बिपाशा बासूशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या दोघांनी ‘अलोन’ या हॉरर सिनेमात एकत्र काम केलं होतं. यावेळी या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. आता या दोघांच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री तशीच कायम आहे. प्रियांका चोप्राच्या घरी पडली होती IT विभागाची धाड, उघडला होता शाहिदनं दरवाजा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात