मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Gangs Of Wasseypur च्या 'त्या' सीनची चर्चा! बॉलिवूडमध्ये Female Representation आहे कुठे?

Gangs Of Wasseypur च्या 'त्या' सीनची चर्चा! बॉलिवूडमध्ये Female Representation आहे कुठे?

गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur) चित्रपटाने आज दहा वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटातल्या एका सीनबद्दल सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur) चित्रपटाने आज दहा वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटातल्या एका सीनबद्दल सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur) चित्रपटाने आज दहा वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटातल्या एका सीनबद्दल सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

मुंबई 20 जून: गॅंगवॉर आणि फुल्ल ऍक्शनपॅक असा बॉलिवूडचा एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे (Gangs Of Wasseypur) ‘गँग्स ऑफ वासेपूर’. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) दिग्दर्शित या चित्रपटाने बॉलिवूडची गणितंच बदलून टाकली. वासेपूर या गावातील ही एक कथा असून तत्कालीन गॅंगवॉर, खून, दरोडे याची एक सुंदर कथा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल आजही बरीच चर्चा होताना दिसते. यातील पात्र, त्यांचे फेमस झालेले डायलॉग यातून आजही हा चित्रपट सगळ्यांच्या लक्षात आहे हे नक्की. या चित्रपटाला आज दहा वर्ष पूर्ण झाली (10 years of Gangs Of Wasseypur) असून त्याबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे.

या चित्रपटात पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रकर्षाने उल्लेख आहे. एका मुलाच्या बदल्यावर आधारित दोन भागांचा हा चित्रपट आहे. पण असं जरी असलं तरी या चित्रपटात मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा विसरून चालणार नाही आणि तो म्हणजे female consent चा. या चित्रपटात एका सीनमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqi) साकारत असलेलं पात्र हुमा कुरेशीच्या (Huma Qureshi) पात्राचा हात धरतं. तेव्हा हुमा कुरेशीच्या तोंडी असं वाक्य की “न विचारता असा हात कसा लावता? आधी परमिशन तर घ्यायला पाहिजे.” यातूनच या चित्रपटात स्त्रियांच्या इच्छेला दिलेलं महत्त्व समोर येतं. भारतात आज जिथे या मुद्द्याबद्दल बरीच जागरूकता करणं बाकी आहे तिथे अशा छोट्याछोट्या सिनमधून का होईना स्त्रियांच्या consent बद्दल बोलणं होताना दिसत आहे.

गँग्स ऑफ वासेपूर सारख्या एका मारधाड ऍक्शन चित्रपटात उचललेलं हे पाऊल लक्षणीय कामगिरी करताना दिसत आहे. अगदी छोट्याश्या वाटणाऱ्या पण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर सहजपणे मांडलेलं मत हा दूरगामी विचार आहे असं म्हणलं जात आहे. आज या 10 वर्षांच्या टप्पयावर आल्यावर हुमा कुरेशीने पुन्हा एका इन्स्टाग्राम स्टोरीतून हाच विचार पुन्हा मांडला आहे.

बॉलिवूड आणि फिमेल रिप्रेझेन्टेशन यांच्यात कायमच वाद होत राहिला आहे. बॉलिवूडमध्ये पुरुषप्रधान पात्रांच्या कथाच आतापर्यंत चालत आल्या आहेत. हिरो कायमच शक्तिशाली, डॅशिंग कूल तर हिरोईन कायम अबला, दुर्बल किंवा अगदीच ग्रे शेडची किंवा बिनडोक दाखवली आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटात स्त्री पात्रांना समान आणि कथेला पूरक असा रोल असावा अशी इच्छा अनेकदा बोलून दाखवली जाते.

मात्र आजपर्यंत बॉलिवूडमध्ये स्त्री भूमिकांना फक्त छान कपडे घालून, बाष्कळ डायलॉग देऊन चित्रपटात sideline केलं गेलं. आज हे चित्र काही प्रमाणात बदलताना दिसत आहे.

हे ही वाचा- Ranbir Kapoor ने फॅन्सना सरप्राईज देत केलं इमोशनल, काय केलं पाहा!

मागच्या काही वर्षात घडलेल्या क्रांतीमुळे बॉलिवूडमध्ये सुद्धा female representation काही प्रमाणात सुधारलेलं दिसत आहे. कथेला पूरक, उत्तम दर्जाचे रोल्स स्त्री अभिनेत्रींना दिले जात आहेत. यात बरचसा वाटा स्त्री अभिनेत्रीचा सुद्धा आहे. अनेक स्त्री अभिनेत्रींनी या चळवळीत भाग घेऊन आपलं मत मांडलं होतं . त्यानंतर आलेल्या स्त्रीप्रधान चित्रपटांचा म्हणजे women oriented चित्रपटांचा सुद्धा एक मोठा वाटा आहे. स्त्री पात्रांवर आधारित कथानकाची बॉलिवूडमध्ये चलती आहे असं म्हणायला हरकत नाही. क्वीन,राझी, छपाक, थप्पड, पिंक, इंग्लिश विंग्लिश अशा मागच्या काळात आलेल्या अनेक चित्रपटांनी स्त्रियांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत मोठं पाऊल उचललं आहे. तर आत्ताच्या काळात शाबाश मिथू, छकडा एक्सप्रेस, सायना, गंगुबाई काठियावाडी अशा बायोपिक चित्रपटातून काही मोठी कामगिरी केलेल्या स्त्रियांची महती जगाला कळत आहे. ओटीटीवर सुद्धा नववंडीच्या अभिनेत्री दणक्यात कमबॅक करत आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Bollywood News, Taapsee Pannu, Women empowerment