मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir Kapoor ने फॅन्सना सरप्राईज देत केलं इमोशनल, काय केलं पाहा!

Ranbir Kapoor ने फॅन्सना सरप्राईज देत केलं इमोशनल, काय केलं पाहा!

रणबीरचा (Ranbir Kapoor) नवा चित्रपट समशेरा येत्या जुलै महिन्यात रिलीज व्हायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने सगळ्यांना थक्क करून सोडणार एक प्रकार केला आहे.

रणबीरचा (Ranbir Kapoor) नवा चित्रपट समशेरा येत्या जुलै महिन्यात रिलीज व्हायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने सगळ्यांना थक्क करून सोडणार एक प्रकार केला आहे.

रणबीरचा (Ranbir Kapoor) नवा चित्रपट समशेरा येत्या जुलै महिन्यात रिलीज व्हायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने सगळ्यांना थक्क करून सोडणार एक प्रकार केला आहे.

    मुंबई 20 जून: बॉलिवूडचा एक सुपरस्टार म्हणून नावारूपास आलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या बराच चर्चेत आहे. रानबिरचं त्याच्या चाहत्यांशी खास नातं आहे. जेव्हा गोष्ट चाहत्यांची असते रणबीर त्यांना कायमच आनंद देत आला आहे. मग ते चित्रपटातून असो किंवा फॅन्स मीटअप मधून असो. सध्या त्याची क्रेझ इतकी वाढत आहे की चाहते सुद्धा त्याला भेटायला कायम उत्सुक असतात. अशातच चाहत्यांसाठी रणबीरने एक खूप खास गोष्ट केली आहे. रणबीरच्या नव्याकोऱ्या ‘समशेरा’ चित्रपटाचं (Samshera movie first poster) पोस्टर आज रिलीज झालं. हा चित्रपट मोठ्या दणक्यात 22 जुलैला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. संजय दत्त, वाणी कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट अप्रतिम असणार यात शंका नाही. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक महिना आधीपासूनच रणबीरने कंबर कसली आहे. रणबीरने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चाहत्यांना मोठं सरप्राईज सुद्धा दिलं आहे. एका खास मीट अँड ग्रीट च्या माध्यमातून रणबीरने त्याच्या काही लकी चाहत्यांची भेट घेतली आहे. रणबीरच्या तीस लकी फॅन्सना ‘समशेरा’ चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लुक (Samshera movie first look) बघायची संधी मिळाली होती. पण त्यात एक धमाल ट्विस्ट होता ज्याचीअपेक्षा कोणत्याच फॅनने केली नव्हती. “आज माझ्या चाहत्यांना माझ्या अपकमिंग फिल्म ‘समशेरा’चं पोस्टर पाहायला मिळणार आहे. पण एक ट्विस्ट असा आहे की त्यांना मला भेटायची संधी मिळणार आहे.” असा शब्दात त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे. (Ranbir Kapoor meeting his fans) तर… खरंच रणबीरच्या काही निवडक चाहत्यांना त्याला भेटायची संधी मिळाली. आलेले सगळेच फॅन्स त्याच्या अभिनयाचं, स्वभावाचं अगदी स्माईलचं सुद्धा कौतुक करत होते. हे सगळं रणबीर आतून ऐकत होता आणि त्याने पोस्टरफाड एंट्री करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याच्या या अचानक भेटीने अनेकजण अगदी इमोशनल होऊन रडायला लागले तर अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता. छोट्यांपासून अगदी तरूणांपर्यंत सगळ्या फॅन्सची रिक्षण एकदम बघण्यासारखी होती. कोणालाच त्याला भेटायला मिळेल याची तसूभर सुद्धा कल्पना नव्हती. हा छोटेखानी इव्हेंट जवळपास महिनाभर आधी घडवला गेला. रणबीरला बघून आनंदाने वेडे झालेले चाहते त्याला येऊन मिठी मारताना दिसले तर रणबीरला सुद्धा हे पाहून खूप छान वाटत होतं. तो सुद्धा त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण एन्जॉय करताना दिसला. हे ही वाचा- Rajkumar Rao: 'बढाई दो' फेम अभिनेत्याच्या मिशा झाल्या गायब, स्वत:ला म्हणतोय छपरी रणबीर एकीकडे समशेरा तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र अशा दोन फिल्मचं एकत्र प्रमोशन करताना दिसत आहे. जिकडे एकीकडे अनेक स्टारचे मोठे चित्रपट येऊन गेले तिकडे रणबीर कधी परततोय याची चाहते वाट बघत होते. आता बँक टू बँक दोन मोठ्या चित्रपटांसह तो परतला आहे. त्याच्या प्रमोशनवर सुद्धा तो बारकाईने लक्ष देत आहे. चाहत्यांना या नव्या चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लुक दाखवत त्यांच्यासोबत वेळ घालवता रणबीर दिसला आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Bollywood News, Ranbir kapoor

    पुढील बातम्या