मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

EXCLUSIVE : 'मी सिद्धार्थ पिठानी...', सुशांतच्या फ्लॅटमेटचा जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती

EXCLUSIVE : 'मी सिद्धार्थ पिठानी...', सुशांतच्या फ्लॅटमेटचा जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) सिद्धार्थ पिठानीने (Siddharth Pithani) सीबीआयला दिलेला जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. यामध्ये सिद्धार्थ पिठानीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) सिद्धार्थ पिठानीने (Siddharth Pithani) सीबीआयला दिलेला जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. यामध्ये सिद्धार्थ पिठानीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) सिद्धार्थ पिठानीने (Siddharth Pithani) सीबीआयला दिलेला जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. यामध्ये सिद्धार्थ पिठानीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

मुंबई, 29 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) याप्रकरणी अनेक नाव चर्चेत आली आहे. यामध्ये सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani) हे नाव वारंवार समोर येत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा जवळचा मित्र आणि त्याचा रुममेट असल्याचे बोलले जाते. दरम्यान तो सुशांतचा क्रिएटिव कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. रियाने सांगितल्यानुसार ती सुशांतच्या घरी राहायला जाण्याच्या आधीपासूनच सिद्धार्थ पिठानी सुशांतसह राहत होता. एका रिपोर्टनुसार सुशांतची बहीण मीतूनेही सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने तिला फोन करून सुशांत दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं होतं. आता या प्रकरणात सिद्धार्थ पिठानी सरकारी साक्षीदार होऊ इच्छितो आहे.

दरम्यान सिद्धार्थने सीबीआयला दिलेला जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. यामध्ये सिद्धार्थ पिठानीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. त्याने असे म्हटले आहे त्याने सुशांतचा पंख्याला लटकलेला मृतदेह त्याने ओ.पी. सिंह आणि नीतू सिंह यांच्या सांगण्यावरून खाली उतरवला. सुशांतला अभिनय क्षेत्र सोडायचे होते, असे देखील या जबाबात त्याने म्हटले आहे.  सुशांतची बहिण प्रियांका आणि रिया मध्ये अनेकदा खटके उडाले होते तसंच सुशांतत सारखा रडायचा, जेवायचा नाही अशा अनेक गोष्टींवर त्याने बोट ठेवले आहे.

असा आहे सिद्धार्थ पिठानीचा जबाब

''मी सिद्धार्थ पिठानी...

मी सुशांत सिंह राजपूतबरोबर 20 जानेवारी, 2020 रोजी मौंट ब्लँक या इमारतीत राहत होतो. मी मूळचा हैदराबादचा आहे. माझे वडील लोगो डिझायनिंग आणि ग्राफिक्स प्रिंटिंगमध्ये काम करतात. चित्रपट अ‍ॅनिमेशनमध्ये मला रस असल्यामुळे मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनकडून एफव्हीसी प्रशिक्षण घेतले. अभ्यासक्रम वर्ष 2019 मध्ये संपला आणि मी अभ्यासाबरोबरच फ्रीलान्सिंग करायचो.

सन 2017 मध्ये मी सेक्रेड फिग डिझाइन नावाच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. जिथे मी व्हिडीओ डिझायनिंग आणि दिग्दर्शन करत होतो. 2018 मध्ये मी एका कामाच्या संदर्भात जयपूरला गेलो होतो तेव्हा मी आयुष शर्माला भेटलो होतो. आयुष आणि सुशांत सिंह राजपूत चांगले मित्र होते. आयुष मला म्हणाला की तो मला मुंबईत चांगली नोकरी देईल आणि माझ्यासाठी सर्व व्यवस्था करेल.

(हे वाचा-SSR Case Update : सीबीआयच्या मागणीनंतर मुंबई पोलीस देणार रियाला सुरक्षा)

मी एप्रिल 2019 रोजी जयपूरहून मुंबईला पोहोचलो. आयुषने वांद्रे येथील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. मुंबई गाठण्याच्या दुसर्‍या दिवशी मी त्यांच्याबरोबर कॅपरी हाइट्स येथील सुशांतच्या घरी गेलो. त्यानंतर सुशांतच्या घरी दिपेश सावंत, सॅम्युएल हॉकीप, अब्बास, केशव आणि इतर दोन माणसे घरी काम करत होती.

सुशांत इमारतीच्या 15-16 मजल्यावर राहत होता. येथे 5 बेडरुम, 2 हॉल आणि एक लिफ्ट होती. त्या बैठकीत आम्ही सुशांतच्या ड्रीम 150 प्रोजेक्टबद्दल चर्चा केली. सुशांत, आकांक्षा, आयुष आणि मी या प्रकल्पात काम करणार होतो. हा प्रकल्प समाज सेवा, बाल शिक्षण, महिला उद्योग, अंध मुलांना संगणक शिक्षण, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, रॉजर फेडरर आणि धोनी यांच्यासह सामने खेळणे यासारख्या स्वप्नांवर काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या भेटीनंतर मला सांगण्यात आले की या कामासाठी मला पैसे मिळणार नाहीत पण सुशांत आमची सर्व काळजी घेईल.

(हे वाचा-SSR Case : संजना सांघीची #Metoo प्रकरणी होऊ शकते चौकशी, अडचणी वाढण्याची शक्यता)

जोस्टेल हॉटेलमध्ये राहात असताना एक दिवस मी, सुशांत, आयुष शर्मा, आकांक्षा, आकांक्षाची बहीण, तिचा मित्र, सुशांतची बहीण प्रियांका, तिचा नवरा सिद्धार्थ, रिया, रियाचा मित्र, कुक केशव आणि इतर दोन लोक पवना लेक येथील फार्म हाऊसवर गेलो होतो. त्यावेळी पार्टी झाली आणि तीन ते चार दिवस तिथे राहिल्यानंतर आम्ही परतलो. रिया आणि सुशांतची बहीण प्रियांका या दोघींचे फार्म हाऊसमध्ये भांडण झाले होते.  त्यावेळी सुशांतने रियाला साथ दिली. यामुळे नंतर मुंबईत आल्यावर 2-3 दिवसातच  प्रियंका आणि तिचा नवरा नाराज होऊन सुशांतच्या घरातून निघून गेले. त्यानंतर सुशांतने मला आणि आयुषला त्याच्या घरी थांबण्यास सांगितले.

तिथे राहत असताना मला समजले की सुशांतची बहीण प्रियांकाने नोकरांना योग्य वागणूक दिली नाही. याच कारणास्तव अब्बास आणि दिपेश सावंत यांनी नोकरी सोडली. तिथे राहत असताना मी व्हिडिओ एडिटिंग आणि सुशांतने दिलेली इतर कामे करायचो. आम्ही वांद्रे याठिकाणच्या घरी काही दिवस रहायचो आणि काही दिवस लोणावळ्याच्या शेतात काम करायचो.

(हे वाचा-सारासह या 7 लोकांबरोबर बँकॉक गेला होता सुशांत, रियाने उपस्थित केला हा मुद्दा)

कॅपरी हाइट्समधील सुशांतच्या घरी त्याच्यावर भूतबाधा झाल्याचा त्याला भास व्हायचा. सुशांतला हे घर सोडायचे होते. सुशांतला बर्‍याचदा असे वाटत होते की कोणीतरी त्या घराच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहे. जेव्हा रिया आणि तिचा भाऊ शोविक तिथे राहायला आले तेव्हा त्यांनाही अशा गोष्टी वाटायच्या. याच कारणांमुळे सुशांतने कॅपरी हाइट्सचे घर सोडण्याचा विचार सुरू केला.

सम्युअल हॉकिप नावाची व्यक्ती सुशांतच्या घरीही राहत होती. तो सुशांतच्या घराची काळजी घेत असे. एक दिवस सुशांतने घरच्या खर्चाचा हिशोब सम्यूअलला विचारला, मग तो देऊ शकला नाही, यावर सुशांतने त्याला बरेच सुनावले होते. यानंतर, सम्यूअल घर सोडून निघून गेला. सुशांतही दु: खी झाला. त्यानंतर जून 2019 मध्ये सुशांत, रिया, आकांक्षा, आनंदी, आयुष आणि आयुषचा मित्र हिमांशू लडाखला गेले. यानंतर सुशांतने आकांक्षाऐवजी आनंदीला सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून नियुक्त केले.

लडाखहून आल्यानंतर सुशांतला घरी ठीक वाटत नव्हते. यामुळे तो रियाबरोबर मुंबईतील वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये राहू लागला. सुशांतने या क्लबचे सदस्यत्व घेतले होते. ते दोघे तिथे पोहणे, टेनिस, बॅडमिंटन, जिम करायचे. सुशांत आमच्याबरोबर पवना तलावातील त्याच्या फार्म हाऊसवर अधिक वेळ घालवत होता. अशा प्रकारे सुशांत आमच्यावर खूप खर्च करायचा. यावेळेस मी सुशांतचा बॉडीगार्ड साहिल आणि मॅनेजर असायचो.

(हे वाचा-CBI ने जवळपास 10 तास केली रियाची चौकशी, ड्रग डीलबाबत खुलासा झाल्याची शक्यता)

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 दरम्यान सुशांतचे लक्ष कामावर लागत नव्हते. त्याने त्याची मैत्रिण रियाबरोबर अधिक वेळ घालवायला सुरुवात केली. तो त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 150 ड्रीमपासून दूर जाऊ लागला. तो बर्‍याचदा वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये राहत होता. दरम्यान, रिया आणि सुशांतने आपल्या युरोप ड्रीम प्रोजेक्टसाठी स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि इतर देशांमध्ये जाण्याची योजना आखली. या टूरसाठी सुशांतने दुसर्‍या कोणालाही सोबत न घेण्याचा निर्णय घेतला, यामुळे आयुष रागावला आणि जोस्टेल हॉटेलमध्ये जाऊन राहू लागला. काही दिवसांनी मीसुद्धा आयुषबरोबर राहायला गेलो. माझ्या वडिलांनी मला बोलावले आणि सांगितले की व्यवसाय चालत नसल्याने घर चालवणे कठीण होत असून वडिलांनी मला पैसे मागितले. ऑक्टोबर 2019 मध्ये मी वडिलांच्या मदतीसाठी हैदराबादला गेलो होतो. निघताना मी सुशांतला सांगितले की हैदराबादमध्ये मी सर्व काही ठीक केल्यावर लवकरच परत येईल. हैदराबादला पोहोचल्यानंतर पाच दिवसांनी मला एनोव्हारा इंडिया कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नोकरी मिळाली.  मला 45,००० हजार रुपये पगार मिळत होता. मी अहमदाबाद याठिकाणी या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तेव्हाच मी इंस्टाग्रामवर सुशांत आणि रियाच्या युरोप दौर्‍याचे फोटो पाहिले.

जानेवारी 2020 रोजी मला पुन्हा सुशांतचा फोन आला, सुशांतने मला सांगितले की तो अभिनय सोडून पुन्हा ड्रीम 150 प्रकल्पात काम करण्यास सुरवात करणार आहे. मी सुशांतला माझ्या घराची परिस्थिती आणि नोकरी करण्याचे कारण सांगितले. तो मला कामाचा पगार देईल असे सुशांतने सांगितले. त्याच वेळी सुशांतने मला सांगितले की सध्या त्याची परिस्थिती ठीक नाही, मी त्याच्याबरोबर राहणे आवश्यक आहे. मी लगेचच अहमदाबादहून मुंबईला सुशांतच्या घरी पोहोचलो. जेव्हा मी सुशांतच्या बेडरूममध्ये पोहोचलो तेव्हा सुशांतने मला मिठी मारली आणि रडू लागला. रडत त्याने मला सांगितले की तो अभिनय सोडून सर्व काही विकून पवनाच्या फार्म हाऊसवर रहायला जाणार आहे. यासह सुशांतने सांगितले की आता घराचा मासिक खर्च फक्त 30000 मध्ये भागवावा लागणार आहे. सुशांत पुढे म्हणाला की, त्याला पवनाच्या फार्म हाऊसमध्ये शेती करायची आहे.

सुशांतने मला त्याच्या बेडरूम जवळच्या खोलीत रहायला सांगितले आणि दीपेश तिथे तीन दिवसांनी माझ्याबरोबर राहणार असल्याचेही सांगितले. जेव्हा मी सुशांतला रियाबद्दल विचारले तेव्हा सुशांत रडला आणि त्याने मला सर्व सोडले व निघून गेल्याचे सांगितले. यावर मी सुशांतला काळजी घेण्यास सांगून शांत राहिलो. जेव्हा मी सुशांतच्या घराच्या मॅनेजर मिरांडाला रियाबद्दल विचारले तेव्हा मिरांडाने सांगितले की रिया सुशांतच्या कार्डवर खरेदी करायची. तिने मला घरातील वस्तू विकायला सांगितले. हाऊस मॅनेजर मिरांडा आणि श्रुती मोदी हे दोघेही सुशांतच्या घरी सकाळी दहा वाजता पोहोचून संध्याकाळी 6 वाजता परत जात असत. दोन दिवसांनंतर दिपेशसुद्धा सुशांतच्या घरी थांबण्यासाठी आला.

काही दिवसांनी रिया सुशांतच्या घरी परत आली. यावेळी रियाने मला सांगितले की आतापासून ती आणि दीपेश एकत्र सुशांतची काळजी घेतील. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुशांतने मला सांगितले की चंडीगडमध्ये आपल्या बहिणीच्या घरी एक महिना जायचे आहे. यानंतर सुशांत, बॉडी गार्ड साहिल सागर आणि सुशांतची बहीण मितू रेंज रोव्हर गाडीने तीन दिवसांनी तेथे पोहोचली. या प्रवासादरम्यान आम्ही अहमदाबाद आणि गुडगाव मधील हॉटेलमध्ये थांबलो. गुडगाव येथे राहत असताना सुशांतला श्वास घ्यायला त्रास होत होता, तो तणावात होता आणि चिंताग्रस्त होता. मग मी सुशांतला डॉ. केर्सी चवडा यांचे औषध दिले आणि त्यांना बरे वाटू लागले.

दुसर्‍या दिवशी चंदीगडमधील सुशांतची बहीण नीतूने मला घरी बोलावले आणि सुशांतबद्दलची सर्व माहिती घेतली. मी त्यांना सर्व सांगितले. डॉ. केर्सी चवडा यांनी दिलेली संपूर्ण माहिती आणि औषधे मी नीतू दीदीला दाखविली आणि आम्ही गेस्ट हाऊसमध्ये रहायला गेलो. दुसर्‍या दिवशी सुशांतने मला फोन करून परत मुंबईला जायचे आहे असं सांगितलं. मी जेव्हा नीतू दीदींच्या घरी पोहोचलो तेव्हा सुशांतची तब्येत बरीच चांगली वाटत होती. नीतू दीदी यांनी मला सुशांतच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितले आणि मग मी, सुशांत आणि बॉडीगार्ड मुंबईला रवाना झालो.

मुंबईत आल्यानंतर मी सुशांतला डॉ. केर्सी चवडा यांनी दिलेली औषधे त्यावेळी दिली. सुशांतनेही नियमित वर्कआउट सुरू केले. पूर्वीप्रमाणेच सुशांतला बरे वाटू लागले. यानंतर सुशांत रियाबरोबर राहू लागला. त्याचवेळी दिग्दर्शक आनंद गांधी आणि जाफ्रे यांनी सुशांतला चित्रपटाची ऑफर दिली.

सुशांतला बरे वाटू लागले, म्हणून त्याने औषध बंद करायला सांगितले. मग मी त्याला अचानक औषध बंद करू नका असा सल्ला दिला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुशांतची तब्येत पुन्हा खालावू लागली. तो आमच्यापासून दूर राहू लागला पण त्यावेळी रिया त्याच्याबरोबर होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुशांतची तब्येत आणखी खालावली. तो खोलीत एकटाच राहू लागला, आमच्याशी बोलणेही बंद केले. म्हणून आम्ही सर्वांनी रिया आणि सुशांतला एकटे सोडले. लॉकडाऊनमध्ये रिया सुशांतसोबत होती.

8 जून रोजी सकाळी 11.30 वाजता रियाने तिची बॅग भरून घराबाहेर पडायला सुरुवात केली. रियाने मला सुशांतची काळजी घ्यायला सांगितले. त्यावेळी सुशांतने रियाला मिठी मारली आणि तिला बाय केले. थोड्या वेळाने सुशांतची बहीण मितू घरी पोहोचली. मितू दीदी सुशांतला खायला देत होती पण सुशांतने खाण्सास नकार दिला. ती सुशांतला आमच्यात मिसळवण्याचा प्रयत्न करीत होती पण सुशांतने यात रस दाखविला नाही. मितू दीदी घरी असताना सुशांतला पुन्हा जुन्या गोष्टी आठवल्यावर रडू यायचे.

त्याच वेळी दिशाच्या मृत्यूची बातमी सुशांतला मिळाली. ही बातमी समजताच सुशांत अस्वस्थ झाला. त्यानंतर सुशांतने कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीचे मॅनेजर उदय यांच्याशी बोलण्यास सुरवात केली. श्रुती मोदीच्या पायाला दुखापतीमुळे या कंपनीने दिशाला सुशांतच्या सेलिब्रिटी मॅनेजरचे काम पाहण्यासाठी काही दिवस पाठवले. 9 जून रोजी सुशांतची मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येच्या बातमीने सुशांत खूप तणावग्रस्त झाला होता. या तणावामुळे सुशांतने मला त्या रात्री बेडरूममध्ये त्याच्याबरोबर झोपण्यास सांगितले आणि दिशाच्या मृत्यू बाबत माहिती देण्यास सांगितले. मी सुशांतला त्या प्रकरणाची सर्व माहिती देत ​​राहिलो.

12 जून रोजी मितूने आपल्या मुलीची आठवण करून दिली आणि ती गोरेगाव येथील घरी परत गेली. 13 जून रोजी मी सुशांतला बिल भरण्यास मदत केली. त्या रात्री सुशांत न जेवता ज्यूस पिऊन झोपी गेला.

14 जून रोजी सकाळी 10 च्या दरम्यान मी हॉलमध्ये आलो आणि काॅम्प्युटरवर काम करण्यास सुरवात केली. रात्री 10.30 च्या सुमारास केशवने मला सांगितले की सुशांत सर दरवाजा उघडत नाहीत. ही गोष्ट मी दीपेशला सांगितली. आम्ही दोघांनी दार ठोठावले पण सुशांतने दरवाजा उघडला नाही. त्याच वेळेस मला मितू दीदीचा फोन आला. ती म्हणाली की ती सुशांतला फोन करत आहे, रिंग वाजते आहे पण तो फोन उचलत नाही आहे. आम्ही तिला सांगितले की आम्ही प्रयत्न करीत आहोत, पण तो दार उघडत नाही आहे.

मी मितू दीदीला घरी बोलावले. मी दीपेशला सांगितले की वाॅचमनला फोन करुन सांग चावीवाल्याला बोलवायला. पण वाॅचमनने नीट मदत केली नाही. मग मी गूगल वरुन रफिक चावीवाले यांचा नंबर काढला आणि त्याच्याशी दुपारी 1.06 मिनिटांनी संपर्क साधला. त्याने मला दोन हजार रुपये मागितले. रफिकच्या सूचनेनुसार मी त्याला लॉकचा फोटो व घरचा पत्ता WhatsAppवर पाठविला. मग मी मितू दीदीला फोन करून चावी वाल्याला बोलावल्याची माहिती दिली. मितू दीदी लवकरच सुशांतच्या घरी पोहोचत असल्याचे तिने मला सांगितले.  दुपारी 1.20 मिनिटांनी रफीक त्याच्या एका साथीदारासह तेथे पोहोचला. कुलूप पाहून तो बोलला चावी बनवू शकत नाही. म्हणून मी त्याला कुलूप तोडण्यास सांगितले. रफिकने काही मिनिटांत लॉक तोडला. मी त्याला दोन हजार रुपये दिले आणि जाण्यास सांगितले.

यानंतर मी आणि दीपेश सुशांतच्या खोलीत गेलो. खोली अंधार होता, दीपेशने खोलीचे लाईट लावले. त्यावेळी आम्हाला पंख्याला हिरव्या कपडल्याने लटकलेल्या अवस्थेत सुशांत सापडला. मी मितू दीदीला हे सांगितले. सुशांतचे पाय पलंगाजवळ होते. त्यानंतर मी माझ्या फोनवरून 108 वर कॉल केला आणि घटनेची माहिती दिली.

लवकरच, मला चंदीगडहून नीतू दीदीचा फोन आला, मी तिला सर्व माहिती दिली, तिने लगेच माझा फोन डिस्कनेक्ट केला. मला तिच्याकडून पुन्हा फोन आला. जेव्हा नीतू दीदी यांनी मला सुशांतबद्दल विचारले तेव्हा मी त्याला सांगितले की सुशांतने आत्महत्या केली आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे. फोनवर सुशांतचे मेव्हणे ओपी सिंहचा आवाज मागून ऐकला, त्यांनी आम्हाला सुशांतला खाली उतरण्यास सांगितले. नीतू दीदीनेही असेच सांगितले. मग मी नीरजला चाकू आणण्यास सांगितले, मी सुशांतच्या गळ्यावरील कपडा चाकू चाकूने कापला, मग मी आणि दीपेश पलंगावर चढलो आणि सुशांतला बेडवर खाली ठेवले.

त्याच वेळी मितू दीदी तेथे आल्या तेव्हा त्यांनी मला सुशांत जिवंत आहे का असे विचारले आणि सुशांतला बेडवर व्यवस्थित ठेवण्यास सांगितले. मग मी, दिपेश आणि नीरज यांनी सुशांतला बेडवर व्यवस्थित ठेवले. सुशांतच्या गळ्यातील कपडा काढला. आम्ही सुशांतला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वांद्रे पोलिस पोहोचले.''

First published:

Tags: Sushant Singh Rajput