मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

SSR Case : संजना सांघीची #Metoo प्रकरणी होऊ शकते चौकशी, अडचणी वाढण्याची शक्यता

SSR Case : संजना सांघीची #Metoo प्रकरणी होऊ शकते चौकशी, अडचणी वाढण्याची शक्यता

'दिल बेचारा'च्या शूटिंगदरम्यान सुशांतवर करण्यात आलेल्या #Metoo च्या आरोपांमुळे त्याची सहकलाकार संजना सांघीची चौकशी सीबीआय करण्याची शक्यता आहे

'दिल बेचारा'च्या शूटिंगदरम्यान सुशांतवर करण्यात आलेल्या #Metoo च्या आरोपांमुळे त्याची सहकलाकार संजना सांघीची चौकशी सीबीआय करण्याची शक्यता आहे

'दिल बेचारा'च्या शूटिंगदरम्यान सुशांतवर करण्यात आलेल्या #Metoo च्या आरोपांमुळे त्याची सहकलाकार संजना सांघीची चौकशी सीबीआय करण्याची शक्यता आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

शिखा धारीवाल, मुंबई, 29 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)मृत्यूनंतर आता सीबीआय चौकशीचा वेग वाढला आहे. याप्रकरणी (SSR Death Case) सीबीआयने शुक्रवारी मुख्य आरोपपत्र असणाऱ्या रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) जवळपास 10 तास दीर्घकाळ चौकशी केली. सीबीआयने समन बजावल्यावर रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसवर चौकशीकरता दाखल झाली होती. रिया व्यतीरिक्त सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंह, दीपेश सावंत,सॅम्युअल मिरांड आणि केशव यांची देखील चौकशी झाली. सीबीआयच्या प्रश्नोत्तरानंतर सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंतर सरकारी साक्षीदार बनण्यास तयार आहेत.

या दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, ऑक्टोबर 2018 मध्ये सुशांतवर मीटू (Metoo) आरोप करण्यात आले होते, याबाबत अभिनेत्री संजना सांघीची चौकशी देखील सीबीआय करू शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार रियाने शुक्रवारी सीबीआय चौकशीमध्ये त्याच्या नैराश्याबाबत विचारले असता, अशी माहती दिली होती की सुशांतवर 2018 मध्ये #metoo चे आरोप करण्यात आले होते. ज्यामुळे सुशांत नैराश्यात गेला होता. कारण सुशांतला असे वाटत होते की त्याने स्ट्रगल करून मिळवलेली इज्जत काही क्षणातच मातीमोल झाली होती.

(हे वाचा-'ब्लॅक पँथर'फेम Chadwick Boseman काळाच्या पडद्याआड, कॅन्सरमुळे निधन)

संजना सांघीने सुशांत आणि तिचे चॅट सोशल मीडियावर शेअर करूनही लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आहे. संजनाने याप्रकरणी सफाई दिली मात्र तोपर्यंत सुशांतचे नाव मीटू प्रकरणात आले होते आणि यामुळे तो नैराश्यात होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, रियाने सीबीआयला अशी माहिती दिली आहे त्यावेळी देखील सुशांत औषधे घेत होता. सुशांतने रियाला असे सांगितले होते की ती घटना घडल्यानंतर अनेक रात्र सुशांत झोपला नव्हता. सुशांतच्या कुटुंबियांना देखील ही गोष्ट माहित होती. तिने असे म्हटले आहे की, माझ्यामुळे सुशांत नैराश्यात गेला नाही, हे आरोप खोटे आहेत.

(हे वाचा-सारासह या 7 लोकांबरोबर बँकॉक गेला होता सुशांत, रियाने उपस्थित केला हा मुद्दा)

रियाच्या या वक्तव्यानंतर सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा (Dil Bechara)मधील अभिनेत्री संजना सांघी हिची देखील चौकशी सीबीआय करू शकते. सीबीआयकडून हे तपासण्याचा प्रयत्न केला जाईल की ही घटना घडली तेव्हा सुशांत कोणत्या स्थितीत होता आणि कुणाबरोबर होता? कोणत्या डॉक्टरचा सल्ला तो त्यावेळी घेत होता. त्याचप्रमाणे सुशांतच्या कुटुंबीयांचा जबाब देखील याप्रकरणी नोंदवण्यात येणार आहे.

First published:

Tags: Sushant Singh Rajput