मुंबई, 29 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर जवळपास 74 दिवसांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) मौन सोडले आणि ती माध्यमांसमोर आली होती. तिने सुशांतच्या कुटुंबीयांबाबत बोलण्यासह त्याच्या लाइफ स्टाइलबाबत देखील भाष्य केले होते. 17 कोटी खर्च करून केलेल्या युरोप टूरबरोबरच तिने बँकॉक ट्रीपचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. रियाने यावेळी असे सांगितले की या ट्रीपसाठी 7 लोकांबरोबर सुशांत गेला होता, ज्याकरता त्याने 70 लाख रुपये खर्च केले होते. रियाच्या या खुलाशानंतर त्याच्याबरोबर कोण 7 लोकं गेली होती असा सवाल उपस्थित केला जात होता. नुकतेच सुशांतच्या एक्स असिस्टंटने याबाबत खुलासा केला आहे. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ने बँकॉक ट्रीपचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कोण ती लोकं आहेत ज्यांच्यावर सुशांतने 70 लाख खर्च केले असा प्रश्न निर्माण झाला होता. सुशांतचा एक्स असिस्टंट साबिर अहमद याने नुकतेच इंडिया टुडेशी केलेल्या बातचीत मध्ये त्या 7 लोकांच्या नावाचा खुलासा केला आहे. (हे वाचा- CBI ने जवळपास 10 तास केली रियाची चौकशी, ड्रग डीलबाबत खुलासा झाल्याची शक्यता) साबिर अहमदने या संभाषणामध्ये असे सांगितले की, या ट्रीपमध्ये 7 लोकं गेली होती. सुशांत सिंह राजपूत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल जावेरी, अब्बास, सुशांतचा बॉडीगार्ड मुस्ताक आणि स्वत: साबिर अहमद. त्याने असे सांगितले की ‘सुशांतची पीआरो टीम आणि सारा अली खान यांची ही एक ट्रीप होती. ज्यामध्ये दोन लोकं आणखी सामिल झाले होते- एक मी आणि त्याचा बॉडीगार्ड मुस्ताक’. या टूरबाबत बोलताना साबिर असे म्हणाला की, ही ट्रीप खूप लक्झरियस होती. 2018 मध्ये डिसेंबर महिन्यात सर्व लोक बँकॉकला खाजगी जेटने गेलो होतो. तो पुढे असे म्हणाला की, तो पहिले तीन दिवस सुशांत आणि साराबरोबर हॉटेलमध्ये होता. पहिल्या दिवशी सर्व लोक बीचवर गेले होते. त्यानंतर सर्वजण बँकॉक फिरण्यासाठी गेले होते पण सारा आणि सुशांत हॉटेलमध्येच होते. (हे वाचा- सुशांतला मानाचा पुरस्कार! दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात होणार सन्मान ) साबिरच्या मते ते सर्वजण बँकॉकमधील आयलँड हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र त्सुनामीमुळे ही ट्रीप मध्येच थांबवावी लागली आणि सर्वांनी परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र मला आणि मुस्ताकला एका महिन्यासाठी बँकॉकमध्ये थांबावे लागले होते, कारण परतण्यासाठी फ्लाइटचे तिकीट्स उपलब्ध होत नव्हते. साबिरने असे सांगितले की त्यांचा एक महिन्यापर्यंतचा सर्व खर्च सुशांतने केला होता. गरज पडल्यावर सॅम्युअलने मुंबईहून पैसे देखील ट्रान्सफर केले होते, महिनाभराने जेव्हा ते परतले तेव्हा सॅम्युअल त्यांना नेण्यासाठी एअरपोर्टवर आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







