मुंबई, 10 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोल चंडेल यांना संपूर्ण मीडियाला अपशब्द वापरून त्यांच्याशी पंगा घेणं भारी पडणार आहे. या सर्व प्रकरणानंतर गिल्ड ऑफ इंडियानं ‘जजमेंटल है क्या’ या कंगनाच्या आगामी सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज न देण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेनं कंगनाचा हा सिनेमा पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना नुकतीच तिच्या सिनेमातील गाण्याच्या लॉन्चिंगवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारावर भडकली होती आणि तिने त्यावेळी या पत्रकाराला अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या. हे सर्व एवढ्यावरच थांबलं नाही तर सोशल मीडियावर तिच्या बहीणीनं मीडियाबद्दल अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या. त्यामुळे आता Entertainment Journalist’s Guild of India या संस्थेनं ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाची प्रोड्युसर एकता कपूर हिला एक पत्र लिहिलं आहे. ज्या कंगनाचा हा सिनेमा पूर्णपणे बॉयकॉट करण्यात येणार असून या सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज देण्यात येणार नसल्याचं म्हटलं आहे. World Cup- Ind vs Nz सामन्यासाठी बॉलिवूडचा टीम इंडियाला अनोखा पाठिंबा
Entertainment Journalists' Guild of India boycotts Kangana Ranaut, decides to "not give her any media coverage" over an incident where she accused a journalist of running a "smear campaign" against her at a song launch event of movie 'Judgementall Hai Kya'. pic.twitter.com/ysOOV5KYrE
— ANI (@ANI) July 9, 2019
या पत्राच्या सब्जेक्ट लाइनमध्येच कंगनानं त्या कार्यक्रमात पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनासाठी तिच्यावर टीका करण्याची मागणी केली आहे. या पत्रात लिहिलं, तुमच्या टीमनं आमच्याकडे अंधेरीमध्ये तुम्ही आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये येऊन हा इव्हेंट कव्हर करण्याची विनंती केली होती. या इव्हेंटमध्ये अभिनेता राजकुमार राव सोबत कंगना रणौत सुद्धा होती. आमच्या एका पत्रकारानं तिला प्रश्न विचारल्यानंतर ती त्याच्यावर भडकली. तसेच त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासही तिनं नकार दिला.
Entertainment Journalists' Guild of India wrote to Ekta Kapoor, Producer of the film 'Judgementall Hai Kya', demanding "an official statement condemning inappropriate actions of Kangana Ranaut" https://t.co/ysGA1t6aeR
— ANI (@ANI) July 9, 2019
Entertainment Journalist’s Guild of India लिहिलेल्या या पत्रात पुढे लिहिलं आहे. हा प्रकार घडला त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता त्यामुळे तुम्हाला याबाबत सर्व माहित आहे. आम्ही तुमच्याकडे एक लेखी पत्र आणि कंगनाकडून झालेल्या गैरवर्तनावर टीका करण्याची मागणी करत आहोत. यासोबतच या प्रकारासाठी कंगनाचा आगामी सिनेमा पूर्णपणे बॉयकॉट करण्यात येणार असून या सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज मिळणार नसल्याचं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खान काय आहे संपूर्ण प्रकरण ‘जजमेंटल है क्या’ मधील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचा एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला होता. एकता कपूर, कंगना रणौत आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी जजमेंटल है क्या सिनेमातील एका रीमिक्स प्रमोशनल गाण्याच्या लॉन्चला पोहोचले होते. पत्रकार परिषद सुरू असताना जस्टिन राव या पत्रकाराने आपलं नाव सांगून प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा कंगनाला जस्टिनशी निगडीत एक जुनी गोष्ट कंगनाला आठवली. मणिकर्णिका या तिच्या सिनेमाशी निगडीत जस्टिनने एक बातमी तिच्याविरुद्ध छापली होती. मग काय कंगनाने मागचा पुढचा विचार न करता जस्टिनला सर्वांसमोर सुनवायला सुरुवात केली. कंगनाच्या या वादामुळे पत्रकार परिषदेला एक वेगळंच वळण आलं. जस्टिन रावच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी कंगनाने त्याच्यावरच अनेक आरोप केले. जस्टिनने मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी सिनेमाबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून नकारात्मक लिहिले. तसेच तिच्याबद्दलही अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या. या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार
यावर जस्टिन म्हणाला की, ‘कंगना तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. मी जे काही लिहितो ते खरं लिहितो. तसेच मी तुझ्याबद्दल कधीही चुकीचं लिहिलेलं नाही.’ जस्टीनने अनेकदा आपलं म्हणण मांडलं तरी कंगना त्याच्यावर ओरडण्याची काही थांबली नाही. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर मणिकर्णिका सिनेमाशी संबंधीत मुलाखतीसाठी हा पत्रकार व्हॅनिटी वॅनमध्ये तीन तास थांबला होता आणि त्याने अनेकदा पर्सनल मेसेजही केले. या सर्व वादात जस्टिन अगदी शांतपणे आणि सन्मानाने एकच गोष्ट वारंवार सांगत होता की त्याने कधीही कंगनासोबत लंच केला नाही. तसेच तो तिच्या व्हॅनिटी वॅनमध्येही गेला नाही. पण कंगना त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
VIDEO : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ‘ही’ निरागस गायिका आहे तरी कोण? यानंतर सर्व स्तरातून कंगनानं त्या पत्रकाराची माफी मागावी अशी मागणी होऊ लागली तसेच तिच्यावर खूप टीकाही झाली. यावर शांत बसेल ती कंगनाची बहीण कसली. तिनं सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मीडियासाठी अनेक अपशब्दाचा वापर करत कंगना कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही उलट तुम्हाला पकडून पकडून मारेल. तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून माफीची मागणी केली आहे असं बरंच काही लिहिलं.
वर्ल्डकपनंतर तुमच्यासाठी आहे फक्त Entertainment Entertainment Entertainment
या सर्व प्रकारानंतर Entertainment Journalist’s Guild of India कंगनाचा सिनमाला कोणत्यही प्रकारचं कव्हरेज न देता हा सिनेमा बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कंगना आणि टीम ‘जजमेंटल है क्या’ यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली असून पत्रकाराशी अशाप्रकारे जाहीर पंगा घेणं कंगनाला खूप महागात पडणार आहे असं बोललं जात आहे. =================================================================== VIDEO: ‘कहो ना प्यार है’ फेम अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता