मुंबई, 9 जुलै: आजकालच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात काण कधी लोकप्रिय होईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा अशा अनेक व्यक्ती या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अचानक प्रकाशझोतात येतात आणि स्टार होऊन जातात. अशात ती जर लहान मुलं असतील तर मग विचारायलाच नको. काही महिन्यांपूर्वी आपल्या आईशी निरागसपणे भांडतानाचा एका गोंडस मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मागच्या काही दिवसांपासून एक छोटी निरागस मुलगी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीला पाहिल्यावर तुम्हाला सारेगमप लिटल चॅम्पमधल्या जयासची आठवणं आल्याशिवाय राहणार नाही. मागच्या काही दिवसांपासून एका लहान मुलीचा गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीचा आवाज एवढा गोड आणि तिच्या चेहऱ्यावर हावभाव इतके निरागस आहेत की सर्वजण तिच्या आवाजाचे दिवाने झाले आहेत. अवघ्या काही वेळातच ही मुलगी सोशल मीडिया स्टार बनली आहे. त्यामुळे ही गोड मुलगी नक्की आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आपल्या गोड आवाजानं अवघ्या नेकऱ्यांना वेड लावणाऱ्या मुलीचं नाव ‘ओली’ असून ती अवघ्या 4 वर्षांची आहे. तिनं गायलेलं ‘दुवा’ हे गाणं सध्या सगळीकडे व्हायरल होत असल्यानं तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे. 15 लोकांसमोर ‘असा’ शूट झाला न्यूड सीन, अभिनेत्रीनं केला खुलासा
ओलीनं गायलेलं या गाण्याचा मूळ गायक अरजित सिंग आहे. अरजित गायलेलं हे गाणं तसं पाहायला गेलं तर गाण्यासाठी खूप कठीण आहे. मात्र लहानग्या ओलीला ते परफेक्ट जमलंय असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या कमी वयात हे गाणं ओलीनं उत्तम पद्धतीन गायलं आहे. त्यामुळे सध्या ओली सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. हॉरर सिनेमा पाहताना थिएटरमध्येच मृत्यू, शेवटपर्यंत कोणाला समजलंच नाही! ======================================================================== EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर