जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी टेलिव्हिजन ते 'दृश्यम 2' मराठमोळ्या अभिनेत्याची गगनभरारी; चाहत्यांकडून होतंय कौतुक

मराठी टेलिव्हिजन ते 'दृश्यम 2' मराठमोळ्या अभिनेत्याची गगनभरारी; चाहत्यांकडून होतंय कौतुक

 'दृश्यम 2'

'दृश्यम 2'

पहिल्याच दिवशी दृश्यम 2 ने चित्रपटगृहांवर आपला दबदबा निर्माण केला आहे. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे. अशातच आता या चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्याचं चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 19 नोव्हेंबर:**मागच्या अनेक दिवसांपासून  प्रेक्षक ज्या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत होतो तो ‘दृश्यम 2’ चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी साळगावकरच्या कुटुंबाशी पंगा घेण्यासाठी अभिनेत्री तब्बू बरोबर अक्षय खन्नाचीही एंट्री झाली आहे. दुसऱ्या भागात संपूर्ण साळगावकर कुटुंब आपल्याला वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. पहिल्याच दिवशी दृश्यम 2 ने चित्रपटगृहांवर आपला दबदबा निर्माण केला आहे. हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींपार जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटातील सगळ्या कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे. अशातच आता या चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्याचं चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे. झी युवा वाहिनी वरील ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ बोडके. या मालिकेतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अभिनेत्री तितिक्षा तावडेसोबत त्याने या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर त्याने अनन्या या नाटकातून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता या  मराठमोळ्या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिद्धार्थ सध्या नुकताच रिलीज झालेल्या ‘दृश्यम 2’ मध्ये अजय देवगणसोबत  झळकत आहे. त्याच्या अभिनयाचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. हेही वाचा - Kriti Senon : ‘टीझरपेक्षा चित्रपटात बरंच काही…’ आदिपुरुषवर टीका करणाऱ्यांवर क्रिती सेननचा संताप सिद्धार्थने दृश्यम 2 च्या प्रीमियर दरम्यान एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला कि, ‘‘लॉकडाउनच्या काळात दृश्यम चित्रपट पाहण्यापासून ते दृश्यम 2 च्या मेगा प्रीमियरचा एक भाग होण्यापर्यंत आणि मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहण्यापर्यंत माझं आयुष्य आश्चर्य आणि कृतज्ञतेने भरलेले आहे.’’ असं म्हणत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहते तसेच कलाकार मित्रांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

जाहिरात

यासोबतच मालिकेतील ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतील त्याची सहकलाकार आणि मैत्रीण अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनेदेखील सिद्धार्थसाठी  खास पोस्ट शेअर केली आहे. तितिक्षाने पोस्टमध्ये लिहलं आहे कि, ‘‘मी तुला यासाठी कठोर परिश्रम करताना पाहिले आहे! तू केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचे मोल आहे! तू चमकलास! मला तुझ्या सर्वात लहान कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो आणि हे खूप मोठे आहे माझ्यावर विश्वास ठेवा की हे खूप मोठे आहे, मला कळत नाही नक्की यावर कशी प्रतिक्रिया द्यावी! बरं, सध्या तरी मी तुझे मनापासून कौतुक करत आहे.’’

News18लोकमत
News18लोकमत

सिद्धार्थ बोडके याने मराठी चित्रपटातंही काम केलं आहे. ‘भय’, ‘नेबर्स’ या चित्रपटासंह ‘व्हायरल जोडी’ या वेब सीरिजमध्येही सिद्धार्थ झळकला होता. दृश्यम २ हा त्याचा पहिलावहिला हिंदी आहे. या चित्रपटात सिद्धार्थने डेव्हिड ही  भूमिका निभावली आहे. आता अजय देवगण आणि तब्बू यांसारख्या कळकरांससोबत काम करायला मिळालं यासाठी त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यासोबतच  चाहते त्याच्या अभिनयाचं देखील कौतूक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात