मुंबई, 17 ऑक्टोबर : मागच्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत होतो तो दृश्यम 2 चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी साळगावकरच्या कुटुंबाशी पंग्गा घेण्यासाठी अभिनेत्री तब्बू बरोबर अक्षय खन्नाचीही एंट्री होणार आहे. येत्या 18 नोव्हेंबरला दृश्यम 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या भागात संपूर्ण साळगावकर कुटुंब आपल्याला वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. दृश्यम 2 सिनेमाच्या ट्रेलरची सुरूवातच विजय साळगावकरच्या दमदार डायलॉगने होतेय. तो म्हणतोय, “सच एक पेड की तरही होता हे जितना चाहे दफना लो, एक न एक दिन बार जरूर आता है”. डायलॉग संपताच सात वर्षांपूर्वीच विजय साळगावकर समोर येतोय आणि पोलिसांनी म्हणतो, “आज सात वर्ष झालेत तरीही माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय”. त्यानंतर तो आपलं कुटुंब भक्कम करण्याच्या प्रयत्नात दिसून येतोय. हेही वाचा - Akshay Kumar : अक्षय कुमारकडे आहे 260 कोटींचे खासगी जेट?; अभिनेत्यानं स्वतःच केला खुलासा ट्रेलरमध्ये अभिनेता अक्षय खन्नाची धमाकेदार एंट्री पाहायला मिळत आहे. तो केस सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मात्र केस पुन्हा येऊन आधीच्याच ठिकाणी थांबतेय. त्याचप्रमाणे अभिनेत्री तब्बूची देखील एंट्री पाहायला मिळेतय. या वेळी तब्बू पोलीस ऑफिसरच्या नाही तर एका आईच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांचे नवे लुक्स प्रेक्षकांना आवडले आहेत.
Shabdon pe nahin, drishyon pe dhyaan do. Kyunki shabdon mein, jhoot chupne ki jagah dhoond hi leta hai.#Drishyam2Trailer Out Now
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 17, 2022
Case Reopens on 18th November, 2022 pic.twitter.com/ePHkWCUIpB
दृश्यम 2चा टीझर पाहून असं वाटलं होतं की अजय देवगण म्हणजेच विजय साळगावकर आपला गुन्हा कबूल करेल आणि तब्बू त्याला तुरूंगात पाठवेल. मात्र ट्रेलर पाहून प्रेक्षकांना पुन्हा एकदा सस्पेंस थ्रीलर पाहायला मिळणार आहे. दृश्यम 2मध्ये पुन्हा एकदा दमदार सस्पेंस थ्रीलर पाहायला मिळणार आहे आणि यावेळी प्रेक्षकांच दुप्पटीनं मनोरंजन होणार आहे.
दृश्यम 2चा ट्रेलर गोव्यात रिलीज करण्यात आला. ट्रेलर रिलीज वेळी गोव्यात सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. अभिनेता अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर हे कलाकार उपस्थित होते.