मुंबई, 16 नोव्हेंबर: दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘ आदिपुरुष ’ हा चित्रपट गेल्या दीड महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकांनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सकडे बोट दाखवले, यात राम आणि रावणाच्या व्यक्तिरेखांविषयी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.काहींनी तर चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली होती. आता या सगळ्या वादावर चित्रपटात सीतेच्या भूमिकेत असणाऱ्या क्रिती सेनन हिने मौन सोडलं आहे. आदिपुरुष चित्रपटाविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना क्रिती चांगलीच भडकली. चला तर मग जाणून घेऊया काय म्हणाली क्रिती सेनन. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाबाबत अनेक अपडेट्स आले आहेत. पण या चित्रपटाशिवाय क्रिती सेनन ‘आदिपुरुष’साठी देखील चर्चेत आहे. अलीकडेच एका मीडिया मुलाखतीत क्रिती सॅननने आदिपुरुषच्या टीझरला विरोध करणाऱ्यांबद्दल आपले परखड मत मांडले आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली कि, ‘‘टीझरमध्ये जे दाखवण्यात आले आहे ते खूपच मर्यादित आहे. आतापर्यंत फक्त 1 मिनिट 35 सेकंदाचा टीझर समोर आला आहे. या चित्रपटात अजून बरंच काही आहे.’’ हेही वाचा - Disha Patani : ‘टायगर अभी जिंदा है…’ दिशाचे ‘या’ अभिनेत्यासोबत फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया ती पुढे म्हणाली कि, ’’ या चित्रपटात आमचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपला इतिहास आणि धर्म एका नव्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक असा चित्रपट आहे ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. हा चित्रपट आपल्या इतिहासाचा एक भाग आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. ते योग्य आणि सर्वोत्तम पद्धतीने मांडण्याची गरज आहे हे लक्षात ठेऊनच ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.’’ असं म्हणत क्रितीने चित्रपटाच्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
दरम्यान आदिपुरुष’ चित्रपटाबद्दल अजून मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे या चित्रपटात आता मोठे बदल करण्यात येणार आहेत. सैफ अली खान आदिपुरुषमध्ये रावणाची भूमिका साकारत आहे. जेव्हा टीझर रिलीज झाला तेव्हा त्याच्या लूकबद्दल वाद निर्माण झाला होता. त्याच्या दाढी आणि मिशीवर लोकांनी आक्षेप घेतला. सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला. आता यावरही निर्मात्यांनी इलाज शोधल्याची बातमी येत आहे. आता VFX च्या माध्यमातून चित्रपटातील रावणाची दाढी आणि मिशा काढली जाणार आहे. ‘इटाईम्स’च्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या लूकवर अजून काम करण्याची गरज आहे. आता अभिनेत्याचा लूक डिजिटल पद्धतीने बदलला जाणार आहे. त्याची दाढी काढली जाईल. यावर आता अनेक लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
सैफ अली खान, प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. आदिपुरुषच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांना प्रेक्षकांना एक अप्रतिम अनुभव देण्यासाठी थोडा अधिक वेळ द्यावा लागेल. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. '’