मुंबई 7 जुलै: स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवर मुंबई-पुणे-मुंबई, मितवा, तू हि रे, दुनियादारी यांसारख्या अनेक सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल गेली दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Swapnil Joshi movie) दरम्यान त्यांची समांतर (Samantar 2) ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांच्या खूप चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु ही सीरिज जशी सुपरहिट ठरली तसे मराठी चित्रपट OTT वर का चालत नाही? असा प्रश्न वारंवार केला जात आहे. स्वप्निलने या प्रश्नाचं खरं उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
रानी चॅटर्जी पडली कॅप्टन अमेरिकाच्या प्रेमात; व्हिडीओ शेअर करत म्हटलं I Love You
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्वप्निलनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने मराठी चित्रपट OTT वर का चालत नाही? याचं कारण देखील सांगितलं. तो म्हणाला, “याला अनेक घटक कारणीभूत आहेत. चित्रपटांचा दर्जा काय?, प्रेक्षकांना ते चित्रपट पाहायचे आहेत का?, माध्यमांमध्ये त्याची तितकी चर्चा आहे का? या सगळ्याचं एका वाक्यात उत्तर देणं थोडं अवघड आहे. कारण चित्रपट जागतिक पातळीवर गाजतात मात्र मराठी प्रेक्षक ते पाहण्यासाठी उत्सुक नसतात. मराठी सिनेसृष्टीसमोर ही खूप समस्या आहे. या समस्येवर समाधान शोधण्यासाठी मराठी इंडस्ट्रीमधील सर्व स्थरावरील मंडळींनी एकत्र यायला हवं. तरच यावर काहीतरी ठोस आणि परिणामकारक उत्तर मिळू शकेल. अन्यथा जे सुरु आहे तसेच सुरु राहिल.”
दिलीप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; गांधीवाले म्हणत टाकलं होतं तुरुंगात
समांतर या सीरिजद्वारे स्वप्नील जोशीनं OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. दोन भिन्न व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य एकाच हस्तरेखेवर आधारित आहे. म्हणजे यामध्ये एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ दाखवण्यात आला आहे. गूढ कथानक, जबरदस्त अभिनय आणि तितक्याच ताकतीच दिग्दर्शन यामुळं ही सीरिज तुफान गाजली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Swapnil joshi, Web series