मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Dilip Kumar Death Anniversary: 'दिलीप साहेबांशिवाय माझं जग निरर्थक अन् रितंरितं', सायरा बानोंचं भावनिक पत्र

Dilip Kumar Death Anniversary: 'दिलीप साहेबांशिवाय माझं जग निरर्थक अन् रितंरितं', सायरा बानोंचं भावनिक पत्र

आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त (Dilip Kumar Death Anniversary) त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांनी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.

आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त (Dilip Kumar Death Anniversary) त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांनी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.

आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त (Dilip Kumar Death Anniversary) त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांनी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.

  मुंबई, 07 जुलै: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. दिलीप कुमार यांचं 7 जुलै 2021 रोजी निधन झालं होतं. आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त (Dilip Kumar Death Anniversary) त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांनी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे. न्यूज 18 च्या शोशासाठी ही नोट लिहून त्यांनी त्यांच्या दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

  सायरा बानो यांनी लिहिलंय की, “दिलीपजींना जाऊन आज वर्ष झालं, मी दररोज त्यांच्या आठवणींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे. मी जे काही करायचे त्यात ते समरसभावाने सामील व्हायचे आणि मला माझ्या दु:खातून बाहेर पडण्याचं बळ द्यायचे. आता दररोज मी झोपेतून उठते तेव्हा मला त्यांचीही सोबत कुणीतरी हिरावून नेल्याची जाणीव होते. गेलं वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण वर्ष होतं. दिलीपसाहेबांशिवाय माझं जग निरर्थक आणि रितंरितं झालंय. ही एकमेव घटना आहे जी अजूनही मी स्वीकारू शकलेली नाही. गेल्या वर्षभरात असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी मला दिलीपसाहेबांची आठवण काढणारी एकही व्यक्ती भेटली नाही.

  हेही वाचा - 'जो आवडे सर्वांना...', अनिता दातेच्या पोस्टवर चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

  आम्ही जवळपास 56 वर्षे एकत्र घालवली आणि पती-पत्नी म्हणून अक्षरशः आम्ही एकत्र वाढलो. सगळ्यांना माहीत आहे की मी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या प्रेमात पडले आणि माझ्यासाठी तेच एकमेव परफेक्ट व्यक्ती आहेत, हे स्वप्न मनात बाळगून मी मोठी झाले. जेव्हा ते स्वप्न सत्यात आलं तेव्हा मला माहीत होतं की, मी एकटीच त्यांची चाहती नाही तर मी मिसेस दिलीप कुमार होण्याची आशा बाळगणाऱ्या महिलांच्या लांब रांगेतली मी एक आहे. मी भाग्यवान होते की मला त्यांची पत्नी, आई, मित्र आणि चाहती सर्व होता आलं. अजूनही मी माझ्या हृदयातल्या कुपीत साठवून ठेवलेल्या आठवणींमध्ये दिलीपजींचा वास आहे.

  जेव्हा माझी प्रिय आजी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका शमशाद बेगम साहिबा (Shamshad Begum Sahiba) यांचं निधन झालं, तेव्हाही मी अस्वस्थ झाले होते, पण तिच्या जाण्याचं दुःख पचवून मी पुढे गेले. ती अम्माजी होती. माझ्यासाठी ती आजी आणि आई दोन्ही होती. तिने मला आणि माझ्या भावाला इंग्लंडमध्ये लहानाचं मोठं केलं, तिथंच आम्ही मोठे झालो. माझी आई नसीम बानू (Naseem Banu), भारताची पहिली ब्युटी क्वीन (Beauty Queen), एक फिल्मस्टार आणि एक धाडसी एकल पालक. आईचं निधन झालं तेव्हाही मी निराश झाले होते, दुःखात होते; पण त्यातूनही मी बाहेर पडले आणि आयुष्यात पुढे गेले. माझा भाऊ सुल्तान अहमद (Sultan Ahmed ) याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. तो तरुण होता, अॅक्टिव्ह आणि खूप प्रेमळ होता. त्याच्या जाण्याने मी उद्ध्वस्त झाले होते, कारण आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो. आमचं कुटुंबातील नात्यांची वीण खूप पक्की होती.

  युसूफ साब (दिलीप कुमार) यांच्यामुळेच मला हे सर्व दुःख पचवून पुढे जाण्याचं धैर्य मिळालं. त्यांनी माझी काळजी घेतली आणि भक्कम मानसिक आधार दिला. माझ्या आयुष्यातील सर्व संकट आणि जवळच्या लोकांना गमावल्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीतून बाहेर यायला हवं हे सांगण्याची त्यांची स्वतःची पद्धत होती. माझं सांत्वन करण्याचा त्यांचा स्वतःचा मार्ग होता आणि ते ठामपणे सांगायचे की जीवनात माणसाने पुढे चालत राहायला हवं कारण या जगात कोणीही अमर (immortal) नाही.

  हेही वाचा - Prajakta Mali: काय शायरी, काय नजर! प्राजक्ताला पडली निसर्गकवींची भुरळ!

  गेल्या साडेपाच दशकांपासून आम्ही दोघांनी जो बेड शेअर केला त्यावरची माझ्या शेजारची जागा मला झोपेतून जागं झाल्यावर मोकळी दिसते. यालाही वर्ष झालं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते मला माझ्या युसूफ साहेबांची साथ तब्बल 56 वर्षं मिळाली, या पुढच्या आयुष्यात हाच विचार मला जगण्याचं बळ देईल असं मी मनालवा वारंवार सांगते. सर्वांना माहीत आहे की मी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या प्रेमात पडले. दिलीपजींनी त्यांच्या कामातून जो समृद्ध वारसा आमच्यासाठी ठेवला आहे त्याच्या शिदोरीच्या माध्यमातून ते माझ्या, त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना गुरू मानणारे चित्रपटांचे अभ्यासक, त्यांचे चाहते या सगळ्यांच्या मनात अजूनही जिवंत आहेत.

  जेव्हा ते माझ्या आजीशी शास्त्रीय हिंदुस्थानी संगीत (Hindustani music) आणि उर्दू कवितांवर (Urdu poetry) चर्चा करायचे तेव्हा व्यक्त होणारं त्यांचं प्रेम, आपुलकी आणि त्यांचे चमकणारे डोळे मला आजही आठवतात. माझ्या आईने फक्त त्यांच्यासाठी बाजूला ठेवलेल्या खास क्रोकरी सेटमध्ये त्यांनी घेतलेला खास चहाचा आस्वाद, त्यांच्या स्वत: च्या कुटुंबासाठी आणि त्याच्या जवळच्या मित्रांबद्दल त्यांना असलेली चिंता, प्रत्येक गोष्ट ज्याला मी स्पर्श करते, ऐकते आणि पाहते त्या प्रत्येक गोष्टीत मला त्यांचं अस्तित्वं जाणवतं आणि हीच गोष्ट मला जिवंत ठेवते. याच सर्व गोष्टींच्या मदतीने मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

  हेही वाचा - Ashadhi Wari: नाचू वारीचे रंगी! शिवलीला पाटील घालतायत फुगडी; शेअर केले वारीतील आनंदाचे क्षण

  माझ्या आयुष्यात असा एकही क्षण जात नाही की जेव्हा त्यांच्या आठवणींनी माझे डोळे पाणावत नाहीत. आमचा कोणताही कर्मचारी किंवा घरातील कोणीही टीव्ही चालू केला आणि त्यांचा एखादा चित्रपट किंवा गाणं पडद्यावर वाजत असेल, तर मी माझ्या भावनांना आवर घालू शकत नाही म्हणून मी त्या खोलीतून बाहेर पडते.

  संपूर्ण जग त्यांच्या आठवणींना उजाळा देतंय, कारण मला वाटतं की ते त्यांच्या चाहत्यांसाठी आणि माझ्यासाठीही अजून जिवंत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी आम्हाला त्यांचं ट्विटर अकाउंट अॅक्टिव्ह करण्याची विनंती केली आहे आणि इन्शाअल्लाह लवकरच ते करण्याचा आमचा विचार आहे.

  त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, मी संपूर्ण दिवस कुराण खानी (निधन झालेल्या लोकांच्या शांतीसाठी उर्दूमध्ये विशेष प्रार्थना) करण्यात घालवणार आहे. ते जिथे आहेत तिथे त्यांच्या प्रियजनांसोबत आणि जवळच्या लोकांसोबत शांततेत आहेत, याची मला खात्री आहे,” असं सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलंय.

  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Dilip kumar