मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ashadhi Wari: नाचू वारीचे रंगी! शिवलीला पाटील घालतायत फुगडी; शेअर केले वारीतील आनंदाचे क्षण

Ashadhi Wari: नाचू वारीचे रंगी! शिवलीला पाटील घालतायत फुगडी; शेअर केले वारीतील आनंदाचे क्षण

वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवण्याचं काम महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी केलं आहे. अशाच कीर्तनकार शिवलीला पाटील ( Kirtankar Shivlila Patil)  या सध्या वारीच्या रंगात न्हाऊन गेल्या आहेत.

वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवण्याचं काम महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी केलं आहे. अशाच कीर्तनकार शिवलीला पाटील ( Kirtankar Shivlila Patil) या सध्या वारीच्या रंगात न्हाऊन गेल्या आहेत.

वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवण्याचं काम महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी केलं आहे. अशाच कीर्तनकार शिवलीला पाटील ( Kirtankar Shivlila Patil) या सध्या वारीच्या रंगात न्हाऊन गेल्या आहेत.

ri मुंबई, 06 जुलै:  आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी ( Pandharpur Wari) करावी असा मोह प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच होतो. टाळ मृदूंगाच्या गजरात बेधुंद होऊन नाचणारे वारकरी पाहिले की खरी तल्लीनता काय असते हे याची जाणीव होते. प्रचंड जनसमुदाय एका विठुरायाला भेटण्यासाठी कित्येक दिवसांची पायपीट करून पंढरीत दाखल होतो. मनात एकमेकांविषयी द्वेष भावना न ठेवता भेदभाव न मानता छोट्यामोठ्यांसमोर नतमस्तक होतात. ही सर्व वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि वाढली. वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवण्याचं काम महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी केलं आहे. अशाच कीर्तनकार शिवलीला पाटील ( Kirtankar Shivlila Patil)  या सध्या वारीच्या रंगात न्हाऊन गेल्या आहेत.

कीर्तनकार शिवलीला पाटील या कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत ती कीर्तन सादर करतात. शिवलीलाची कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी खास शैली आहे. सोशल मीडियावर त्यांना मानणारा, फॉलो करणारा वर्ग बराच मोठा आहे. त्यांचे किर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  त्या सध्या वारीत दंग झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या वारीत सहभागी झाल्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये शिवलीला वारकऱ्यांबरोबर टाळ, मृदुंग वाजवताना तसेच फुगडी घालताना दिसत आहेत. 'वारीतील आनंदाचे क्षण' असे लिहीत त्यांनी हे व्हिडीओ शेअर केले आहेत. आळंदीमध्ये त्यांनी ही वारकऱ्यांची सेवाही केली.

हेही वाचा - विठ्ठल भक्तीत तल्लीन झाला अभिनेता, विशाल निकमचा वारी स्पेशल VIDEO नक्की पाहा

कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉस या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. शिवलीला पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटना त्यावर नाराज होत्या. त्यासाठी त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच त्या प्रकृती स्वास्थ्याचं कारण बिग बॉसमधून बाहेर पडल्या होत्या. तसेच पाटील यांनी 'बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक होती' असे म्हणत वारकरी संप्रदायाची माफीही मागितली होती. शिवलीला पाटील या नुकत्याच झी टॉकीजवरील मन मंदिरा - गजर भक्तीचा या कार्यक्रमात आषाढी वारी विशेष भागात कीर्तन करताना दिसल्या होत्या.

First published:

Tags: Ashadhi Ekadashi, Bigg boss marathi, Marathi entertainment, Pandharpur, Wari