मुंबई, 07 जुलै: ‘मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको’, असं म्हणतं टेलिव्हिजनवर समस्त महिलावर्गाच्या मनावर राज्य करणारी सर्वांची लाडकी राधिका ( Radhika Masale) म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते ( Actress Anita Date) ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ( Majhya navryachi Baiko) या मालिकेमुळे अनिता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर तिनं अनेक सिनेमातही काम केलं. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘मी वसंतराव’ ( Me Vasantrao) सिनेमात तिनं वसंतरावांच्या आईची भूमिकी उत्तमरित्या वठवली. अनिता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या सगळ्या पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. मात्र अनितानं नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे तिचे चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. अनितानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या फोटोला हार घातलेला दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांची झोप उडाली असून अनिता चक्क चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘जो आवडतो सर्वांना…’, असं म्हणत अनितानं तिचा फोटो शेअर केला आहे. तिच्या फोटोला चंदनाचा हार घातला आहे. फोटोमध्ये अनिता वेगळीच दिसत आहे. अनितानं असा फोटो का शेअर केला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अनिताला काय झालं आहे? असा प्रश्न तिचे चाहते तिला विचारत आहेत. चाहतेच नाही तर अनिताच्या सहकलाकार मित्रांनीही अनिताचा फोटो पाहून चिंता व्यक्ती केलीय. काहींनी तर तिची खिल्ली देखील उडवली आहे.
हेही वाचा - ‘काली’ पोस्टरनंतर लीना मणिमेकलाईचं नवं ट्विट; आता पोस्ट केला ‘भगवान शिव-पार्वती’चा वादग्रस्त फोटो अनिता दातेच्या फोटोला चंदनाचा हार घातलेला फोटो पाहून अनिताचं निधन झालं आहे असा समज करुन अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र असं काहीही झालेलं नसून हे अनिताच्या नव्या कामाचं प्रमोशन आहे. अभिनेत्री अनिता दाते लवकरचं नवी कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनिता त्याचंच प्रमोशन करताना दिसतेय हे मात्र नक्की. मात्र हा सिनेमा आहे ? नाटक? की नवी मालिका ? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकही हे जाणून घेण्यासाठी उत्साही आहेत. अनिताच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. अभिनेता दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरनं अनिताचं कॅप्शन वाचून म्हटलंय, ‘तो जातो देवाच्या गावाला… कधी परत येतेयस’. तर ‘काय हे’, म्हणत अभिनेत्री श्रृती मराठे हिनं चिंता व्यक्त केली आहे. निपूण धर्माधिकारी , पर्ण पेठे यांनावर अनिताची पोस्ट पाहून हसू आवरलेलं नाही. तर एका युझरनं कमेंट करत म्हटलं, ‘सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत ना तुझ्या? नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही…’, तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘हे प्रमोशनसाठी असेल तर प्लिज मला सांगा. मला हे खरं वाटत आहे’.