मुंबई 04 ऑगस्ट: झी मराठीवर नव्याने चालू झालेला बस बाई बस हा कार्यक्रम बराच रंगतदार दिसत आहे. मागच्याच आठवड्यात आलेल्या दोन पाहुण्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकल्याने आता येत्या आठवड्यातील पाहुणीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. या आठवड्यात या लेडीज स्पेशल बसमध्ये अमृता फडणवीस सहभागी होणार असून त्यांच्या मंगळसूत्रावर आधारित एक सुपरहिट किस्सा त्या शेअर करणार आहेत. या कार्यक्रमात सामान्य प्रेक्षक महिला आलेल्या सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. अमृता यांना सुद्धा एक महिला गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई बोलतात का असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यावर अमृता असं सांगतात, “मंगळसूत्र म्हणजे नवरा अर्थात सौभाग्याचं निशाण असतं. पण मला असं वाटतं की आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात दिलेला कधीही चांगला, म्हणून मी कायम हातात मंगळसूत्र घालते. म्हणजे मला नेहमी वाटत की देवेंद्र माझ्यासोबत आहेत आणि आम्ही एकमेकांचा हात धरून ठेवला आहे. जसा अनेकांचा गळा पकडला असतो तर गळ्याला फास बसण्यापेक्षा हातात हात कधीही छान.” हे ही वाचा- Amruta Fadnavis in Bus Bai Bus: अमृता फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं प्लास्टिक सर्जरीवर भाष्य; म्हणाल्या… अमृता यांनी ब्युटीपार्लर, मेकअप आणि प्लास्टिक सर्जरी यावर सुद्धा आपलं मत या कार्यक्रमात मांडलं आहे. तसंच एका सेगमेंट मध्ये त्या चक्क देवेंद्र यांच्या फोटोशी गप्पा मारताना सुद्धा दिसून आल्या आहेत. देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा कार्यक्रमात बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, “अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?”
अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं होतं. त्या सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच सक्रिय आहेत. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचे नवेनवे प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे.

)







