मुंबई, 30 जानेवारी : शाहरुख खान चा पठाण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करतोय. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि शाहरुख सिनेमा प्रमुख भूमिकेत आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे सिनेमा वादात सापडला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर कितपत चालेल अशा शंका उपस्थित झाल्या मात्र सिनेमानं पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली. पठाणच्या 500 कोटींच्या कमाईनंतर शाहरुखसह सिनेमांची संपूर्ण टीम पहिल्यांदा मीडियासमोर आली आहे. यावेळी शाहरुख आणि दीपिकानं प्रेक्षकांची संवाद साधला. सिनेमाचा अनुभव सांगताना दीपिकाच्या डोळ्यात पाणी ती सर्वांसमोर भावुक झाली. बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पठाण हा सिनेमा दीपिका आणि शाहरुख दोघांसाठी त्यांच्या करिअरमधील महत्त्वाचा सिनेमा होता. सिनेमाविषयी बोलताना दीपिका म्हणाली, ‘मी शाहरुखनं अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. पण माझ्यासाठी हा सिनेमा फार वेगळा होता. अनेकांना माहिती आहे की कोणत्याही गोष्टीचा आनंद झाला की माझ्य डोळ्यात नक्कीच पाणी येतं’, म्हणत दीपिका भावुक झाली. हेही वाचा - Pathaan Box Office Collection : पहिल्या दिवशी 55, पाचव्या दिवशी हॅट्रिकच केली; पठाणची 500 कोटींची कमाई दीपिका पुढे म्हणाली, मी आणि शाहरुखनं अनेक सिनेमात एकत्र काम केलं. अनेक सिनेमात आम्ही रोमँटिक सीन केले पण या सिनेमात आम्ही फायटिंग सीन्सही केलेत. त्यामुळे माझ्यासाठी हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा खूप वेगळा आणि महत्त्वाचा होता.
भूमिकेचं दडपण होतं सिनेमात काम करताना मला खूप दडपण होतं. पण शाहरुखबरोबर शुटींगला सुरूवात झाली आणि सगळं दडपण दूर झालं. आम्ही 4-5 सिनेमे एकत्र केले. सगळ्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पठाण देखील उत्तम कमाई करत आहे. प्रेक्षकांनी आम्हाला दिलेलं प्रेम हे खूप वेगळं आणि अनोख होतं, असं दीपिका म्हणाली.
पठाण सिनेमा अवघ्या पाच दिवसात 500 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई करत पठाणनं रेकॉर्ड ब्रेक केला. पाच दिवसात सिनेमानं त्याचा नवा रेकॉर्ड तयार केलाय. सिनेमातून शाहरुखनं तब्बल चार वर्षांनी कमबॅक केलंय.