अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत असलेला पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झाला. शाहरुखचा पठाण पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. फिल्म क्रिटिक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, सिनेमानं पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली. पठाणनं दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनी 68 कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड केला. तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी 38 कोटी, शनिवारी 51.50 कोटींची कमाई केली. रविवारी सिनेमानं सर्वाधिक म्हणजेच 58.50 कोटींचा गल्ला जमवला. मागील पाच दिवसात पठाणनं भारतात 335 कोटी तर भारताबाहेर 2.7 कोटींची कमाई केली. पठाणनं पाच दिवसात 500 कोटी क्रॉस केलेत. वर्ल्डवाईल पठाणनं एकून 542 कोटी कमावले आहेत.