जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तारक मेहता..’ मध्ये आता दिसणार नवीन दयाबेन, दिशा वकानीला या अभिनेत्रीने केले रिप्लेस

‘तारक मेहता..’ मध्ये आता दिसणार नवीन दयाबेन, दिशा वकानीला या अभिनेत्रीने केले रिप्लेस

‘तारक मेहता..’ मध्ये आता दिसणार नवीन दयाबेन, दिशा वकानीला या अभिनेत्रीने केले रिप्लेस

दिशाच्या मते, तिला मानधनात १०० टक्के वाढ हवी होती. मात्र निर्मात्यांनी ती देण्यास मनाई केली. तसेच तिला ३० दिवसांची नोटीसही दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै- सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी परतणार नसल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. यामुळेच अनेक दिवसांपासून निर्माते नवीन दयाबेनच्या शोधात होता. आता निर्मात्यांचा हा शोध संपला असं म्हटलं जात आहे**.** निर्मात्यांनी विभूती शर्माला या भूमिकेसाठी विचारले आहे. स्पॉटबॉयईने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी अनेक दिवसांपासून ऑडिशन सुरू होते. एवढ्या दिवसांच्या ऑडिशननंतर विभूती शर्माला दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी निवडण्यात आले आहे. मात्र विभूतीने अजूनपर्यंत शो साइन केलेला नाही. पण लवकरच ती दयाबेनच्या व्यक्तिरेखेत दिसेल असं म्हटलं जात आहे. Saaho मधील ‘द सायको सैयां’ गाण्याचा पहिला लुक व्हायरल, प्रभासवरून हटत नाही नजर

जाहिरात

Bottle Cap Challenge- Akshay Kumarने एकाच किकमध्ये उघडलं बाटलीचं झाकण VideoViral दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ते नव्या दयाबेनच्या शोधात असल्याचं सांगितलं होतं. मोदी म्हणाले होते की, ‘मला आता नवी दयाबेन शोधावी लागणार आहे. कोणीही मालिकेपेक्षा मोठा नाही. त्यामुळे आता नवीन चेहऱ्यासोबत मालिका पुढे जाणार आहे. कारण दयाबेनशिवाय मालिकेचं कुटुंब अधुरं आहे. आम्ही दिशाला सुट्टी दिली पण तिची कायमस्वरुपी वाट पाहत बसू शकत नाही.’ दिशाने २०१७ च्या शेवटाला शो तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये मॅटर्निटी लिव्ह घेतली होती. मात्र त्यानंतर ती शोमध्ये परतलीच नाही. दिशाच्या मते, तिला मानधनात १०० टक्के वाढ हवी होती. मात्र निर्मात्यांनी ती देण्यास मनाई केली. तसेच तिला ३० दिवसांची नोटीसही दिली. मात्र तरी दिशा मालिकेत परतली नाही. सुशांत सिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा पडली प्रेमात, असं केलं प्रपोज SPECIAL REPORT: …आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात