मुंबई, 19 मार्च : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याला ब्रँडेड गाड्यांचं किती वेड आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यांच्याकडे अनेक बँडेड कंपन्यांच्या कार आहेत. पण आता यात आणखी एका कारची नव्यानं भर पडली आहे. ह्युंदई कंपनीच्या नवीन क्रेटा ( New Hyundai Creta) कारची डिलिव्हरी नुकतीच भारतात सुरू करण्यात आली आणि या कारची पहिली चावी शाहरुख खानकडे सोपवण्यात आली. अशा रितीनं या कारची मालकी असलेला शाहरुख खान पहिला भारतीय ठरला. ऑटो एक्सपो 2020 मध्ये शाहरुख खाननंच या कारचं अनावरण केलं होतं. क्रेटाला भारतात विशेष पसंती मिळाली. पण काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये आलेल्या सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन सारख्या गाड्यांमुळे स्पर्धा बरीच वाढली. पण क्रेटा त्यातही खास आहे कारण या कारचा फक्त लुकच चांगला नाही तर लुकसोबतच ही कार मॅकेनिकली सुद्धा खूप चांगली आहे. या कारची डिलिव्हरी नुकतीच भारतात सुरू झाली आहे. दरम्यान शाहरुखला या कारची पहिली चावी देतानाचा फोटो ह्युंदईनं त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर शेअर केला. Coronavirus दरम्यान मालदिवमध्ये एन्जॉय करतेय अभिनेत्री, शेअर केले HOT PHOTOS
The Ultimate SUV for The Ultimate Star!
— Hyundai India (@HyundaiIndia) March 17, 2020
It was the Ultimate Star Shahrukh’s wish to get his Ultimate SUV on the first day of deliveries.
We made it happen. Wishing @iamsrk Ultimate Drives in his #AllNewCRETA! pic.twitter.com/LaZnrRyLeB
New Hyundai Creta चे फिचर्स कारच्या बाहेच्या बाजूला कारला थ्री पार्ट एलईडी लॅम्प आणि स्क्वायर्ड व्हील आर्क लावण्यात आला आहे. क्रेटाच्या या नव्या व्हर्जनमध्ये ग्रिल, नव्या सेटची अलॉय व्हिल आणि ब्रँड न्यू केबिन देण्यात आली आहे. कारमध्ये ड्युअल टोन केबिन आहे. याशिवाय याअपडेटेड क्रेटामध्ये कंपनीनं बरेच चांगले फिचर्स दिले आहेत. ज्यात अॅडव्हॉन्स ब्लू लिंक कनेक्टिव्हिटी सिस्टिमसोबत 10 इंच टचस्क्रिन इन्फोटेमेंट सिस्टम, डिजिटल डिस्प्लेसोबत 7.0 इंच इन्स्ट्रुमेंट क्ल्सस्टर, 8 स्पीकरसोबत बोस साउंड सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि फ्लॅट बॉटम स्टीयरिंग देण्यात आलं आहे. शाहिद-मीराकडून घडली मोठी चूक, BMC ने केली कडक कारवाई कारच्या इंजिन बद्दल बोलायचं तर यात 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटरचं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. ही दोन्ही इंजिन 6- स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येतात. याशिवाय 1.4 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिनवाल्या क्रेटामध्ये 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. हा कार इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट्स अशा तीन ड्रायव्हिंग मोडमध्ये तयार केली गेली आहे. तसेच यात स्नो, सॅन्ड आणि मड तीन ट्रॅक्शन कंट्रोल मोड देण्यात आले आहेत. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर कार चालवणं सोपं जाईल. या कारची सुरुवातीची किंमत 10 लाख आहे. शशांक केतकरनं घेतली ‘पिशवीवाल्या’ आजोबांची भेट, शेअर केली माहीत नसलेली गोष्ट