मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जॅकलिन-नोराचं नाही तर...सारा-जान्हवीसह भूमी पेडणेकर होती सुकेशच्या निशाण्यावर, ED तपासातून समोर आली माहिती

जॅकलिन-नोराचं नाही तर...सारा-जान्हवीसह भूमी पेडणेकर होती सुकेशच्या निशाण्यावर, ED तपासातून समोर आली माहिती

महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन आणि नोरा यांच्याशिवाय आणखी तीन बॉलिवूड अभिनेत्रींना लक्ष्य केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून समोर आले आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन आणि नोरा यांच्याशिवाय आणखी तीन बॉलिवूड अभिनेत्रींना लक्ष्य केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून समोर आले आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन आणि नोरा यांच्याशिवाय आणखी तीन बॉलिवूड अभिनेत्रींना लक्ष्य केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून समोर आले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 फेब्रुवारी- मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत आहे ती तिच्या महाठग सुकेश चंद्रशेखरबरोबरच्या (Sukesh Chandrasekhar) रिलेशनमुळे. महाठग समजला जाणारा सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे. 200 कोटीपेक्षा जास्त खंडणी वसुली केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेशबाबत आणखी एक मोठा माहिती समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन आणि नोरा यांच्याशिवाय आणखी तीन बॉलिवूड अभिनेत्रींना लक्ष्य केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून समोर आले आहे.

'इंडियाटुडे' च्या रिपोर्टनुसार सुकेश चंद्रशेखरने सारा अली खान (Sara Ali Khan), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या अभिनेत्रींना देखील फसवण्याच्या तयारीत होता. सुकेशने जॅकलिनला खूप महागड्या भेटवस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. या दोघांचे काही पर्सनल फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासोबतच सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) देखील कोटीच्या भेटवस्तू दिल्या आहेत.

वाचा- लग्नाला झाला एक महिना! जुईलीनं शेअर केला रोहितसोबतचा बेडरूम Video

ईडीच्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला सोनं व डायमंडचे दागिने, 4 पार्शियन मांदरे, 52 लाखाचा घोडा याशिवाय अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. याप्रकरणात मागील वर्षी श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे नाव देखील आले होते. रिपोर्ट्सनुसार, तेव्हा सुकेशने ईडीसमोर श्रद्धा कपूरला 2015 पासून ओळखत असल्याचं कबूल केलं होत. तसेच ड्रग्स केसमध्ये एनसीबीला मदत देखील केली होती. श्रद्धा कपूरचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबधीत ड्रग्स केसमध्ये समोर आलं होतं.

वाचा-'पाय मांडीपासून कापला आता हात..' मराठी अभिनेता जगतोय हालाकीचं जीवन

जेलमध्ये का बंद आहे सुकेश?

सुकेश चंद्रशेखरने रॅनबॅक्सीच्या माजी मालकाची पत्नी अदिती हिला जाळ्यात अडकवून सुमारे 215 कोटी रुपये वसूल केले होते. या आरोपांमध्ये सुकेश जेलमध्ये बंद आहे. सुकेशने जेलमधून जॅकलिनला फोन केला होता.कधीकाळी तो स्वत:ला गृह मंत्रालयाचा मोठा अधिकारी असल्याचे सांगून तर कधी कायदा सचिव, गृहसचिव बनून लोकांना जाळ्यात अडकवत होता.

First published:

Tags: Bhumi pednekar, Bollywood News, Entertainment, Jacqueline fernandez, Janhvi kapoor, Sara ali khan