मुंबई, 30 मे : महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्स ने सोमवारी, 29 मे रोजी रात्री पुन्हा एकदा इतिहास रचला. या संघाने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर CSK आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात जबरदस्त सामना झाला. सीएसकेने सामना जिंकल्यानंतर बॉलिवूडकर देखील खुश झाले. अनेक अभिनेत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत CSK ला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या अपयशानंतर काही नेटकऱ्यांनी सारा अली खानवर निशाणा साधला आहे. आयपीएल फायनल 2023 हा खरोखरच रोमांचक सामना होता कारण चेन्नई सुपर किंग्ज गुजरात टायटन्स विरुद्धच्या खेळीत शेवट्पर्यंत सगळ्यांना खिळवून ठेवलं होतं. पावसाने मॅचमध्ये अडथळा आणला तरी शेवटी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. दरम्यान, क्रिकेटप्रेमी सेलिब्रिटींनी देखील या सामन्याचा आनंद लुटला आहे. सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
रणवीर सिंग रवींद्र सिंग जडेजाची खेळी पाहून खुश झाला आहे. तो म्हणाला, ‘रवींद्र सिंग जडेजा!!!! अरे देवा काय फिनिश, काय फायनल.’ यासोबतच त्याने मॅचचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. तर अभिषेक बच्चनने देखील चेन्नई सुपर किंग्जचे अभिनंदन केले आहे. तसेच गुजरात टायटन्स संघाने चांगली खेळी खेळल्यामुळे त्यांचे देखील कौतुक केले आहे. सीएसकेच्या विजयानंतर कार्तिक आर्यननेही आनंद व्यक्त केला आहे. रवींद्र जडेजाचे कौतुक करताना त्याने तो फोटो शेअर केला, ज्यामध्ये धोनीने आनंदाने ‘जड्डू’ला आपल्या उचलून घेतले आहे. Naseeruddin Shah: ‘मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन….’ ‘द केरळ स्टोरी’ बद्दल बोलताना नसीरुद्दीन शाहांनी साधला निशाणा कालच्या मॅच मध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सारा अली खानची. कालची मॅच पाहण्यासाठी ती स्टेडियममध्ये विकी कौशल सोबत उपस्थित होती. खरतर तिच्या आणि गुजरात टायटन्सचा खेळाडू शुभमन गिल या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अशा परिस्थिती काळ साराने CSK ला पाठींबा दिला. एवढंच नाही तर CSK च्या विजयानंतर आनंद देखील व्यक्त केला. मागच्या दोन मॅच मध्ये शतक ठोकणारा शुभमन काल लवकरच आउट झाला. याचं कारण सारा अली खान समजून आता गुजरात टायटन्सचे चाहते साराला ट्रोल करत आहेत.
सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बदले तेरे माही… लेके जो कोई सारी, दुनिया भी देदे अगर… तो किस दुनिया चाहिये!!! जड्डू तू रॉकस्टार आहेस. काय मॅच GT… संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. हे स्पष्ट आहे की गेम वास्तविक विजेत्याचा आहे. ’ असं म्हटलं आहे. एकंदरीतच CSK च्या विजयानंतर बॉलिवूडचे सेलेब्स खुश असले तरी साराला मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.