जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Naseeruddin Shah: 'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन....' 'द केरळ स्टोरी' बद्दल बोलताना नसीरुद्दीन शाहांनी साधला निशाणा

Naseeruddin Shah: 'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन....' 'द केरळ स्टोरी' बद्दल बोलताना नसीरुद्दीन शाहांनी साधला निशाणा

 नसीरुद्दीन शाह

नसीरुद्दीन शाह

नुकतंच नसीरुद्दीन शाह यांनी असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच एका मुलाखतीत या अभिनेत्याने सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. काय म्हणाले नसीरुद्दीन शाह जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मे :  बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या दमदार अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. नसीरुद्दीन शाह स्पष्टवक्ते आहेत. ते त्यांचं मत ठामपणे मांडतात. चाहत्यांकडून अनेकदा त्यांना समर्थन मिळतं तर अनेकदा विरोधाचा सामना देखील करावा लागतो. नुकतंच  नसीरुद्दीन शाह यांनी असंच वक्तव्य केलं आहे ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच एका मुलाखतीत या अभिनेत्याने सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. काय म्हणाले नसीरुद्दीन शाह जाणून घ्या. नसीरुद्दीन शाह यांनी नुकतेच मोदी सरकार बाबत वक्तव्य केले आहे. आजकाल शाह ZEE5 च्या वेब सीरिज ‘ताज - डिवाइडेड बाय ब्लड’ साठी चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी राजा अकबराची भूमिका साकारली आहे. ही वेब सिरीज मुघलांच्या राजवटीतील राजे आणि सम्राटांच्या आयुष्यावर आधारित आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी मुघलांचा अपमान करू नये, असे शाह यांनी म्हटले होतं. तेव्हा त्यांचा या वक्तव्याची खूपच चर्चा झाली होती. आता एका मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी मुस्लिमांबद्दल द्वेषाचे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी ‘द केरळ स्टोरी’बाबत मौन सोडले. अभिनेता म्हणाला, ‘होय, अर्थातच, ही चिंताजनक बाब आहे. हा एक संपूर्ण प्रचारात्मक चित्रपट आहे. सुशिक्षित लोकांमध्येही मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन बनली आहे. सत्ताधारी पक्षाने अतिशय हुशारीने त्याचा वापर केला आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. मग प्रत्येक गोष्टीत धर्म का आणताय?" असं म्हणत या अभिनेत्याने सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. Zaira Wasim: नकाब घालून जेवणाऱ्या मुलीच्या समर्थनार्थ उतरली दंगल गर्ल; म्हणाली ‘आम्ही हे तुमच्यासाठी करत…’ अभिनेता नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर काहीही बोलत नाही. आपल्या देशातील राजकीय पक्ष निवडणुकीत धर्माचा खुलेआम वापर करतात. इतकेच नाही तर अल्लाह हू अकबरच्या नावाने कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली असती तर आतापर्यंत गदारोळ झाला असता. इतकंच नाही तर आपल्या मुलाखतीत अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनीही कर्नाटक निवडणुकीचा उल्लेख करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भडक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी निवडणुकीसाठीही धर्माचा वापर करतात, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. धर्माचा हा वापर लवकरच संपेल असे मला वाटते. असं मत व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात