मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra trailer release : आलिया-रणबीरनं कित्येक रात्री जागून काढल्या, शेवटी तो दिवस आला

Brahmastra trailer release : आलिया-रणबीरनं कित्येक रात्री जागून काढल्या, शेवटी तो दिवस आला

आलिया आणि रणबीर या जोडीचा आगामी चित्रपट फारच खास असणार आहे. सप्टेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या अयान मुखर्जी दिग्दर्शित बिगबजेट बहुचर्चित चित्रपट “ब्रह्मास्त्र’साठी (Brahmastra) 15 जून तारीख खूप महत्त्वाची असणार आहे.

आलिया आणि रणबीर या जोडीचा आगामी चित्रपट फारच खास असणार आहे. सप्टेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या अयान मुखर्जी दिग्दर्शित बिगबजेट बहुचर्चित चित्रपट “ब्रह्मास्त्र’साठी (Brahmastra) 15 जून तारीख खूप महत्त्वाची असणार आहे.

आलिया आणि रणबीर या जोडीचा आगामी चित्रपट फारच खास असणार आहे. सप्टेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या अयान मुखर्जी दिग्दर्शित बिगबजेट बहुचर्चित चित्रपट “ब्रह्मास्त्र’साठी (Brahmastra) 15 जून तारीख खूप महत्त्वाची असणार आहे.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 14 जून: बॉलिवूडचा बहुचर्चित बिगबजेट सिनेमा ‘ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा’ (Brahmastra movie) बद्दल तुफान चर्चा सुरु आहे. हळूहळू या सिनेमाचे पत्ते उलगडून एक एक भूमिका कोण करणार त्या कलाकारांची नावं समोर येत आहेत. सध्या या चित्रपटाबद्दल माहिती नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. या सिनेमासाठी उद्या एक खूप मोठा दिवस असणार आहे. कारण या बिगबजेट चित्रपटाचा ट्रेलर 15 जून रोजी रिलीज होणार आहे.

तब्ब्ल 300 कोटींच्या घरात बजेट असणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर-आलिया भट्ट (Ranbir Kapoor-Alia Bhatt) ही सुप्रसिद्ध जोडी असणार आहे. ही एक ट्रायलॉजी असून हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात (Amitabh Bachchan) महानायक अमिताभ बच्चन, (Nagarjuna) नागार्जुन, (Mouni Roy) मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी त्यांचं आयुष्य पणाला लावत खूप कष्ट घेतले आहेत असं कलाकार सांगतात. रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) त्याच्या फॅन्सना आठवण करून देण्यासाठी खास विडिओ पोस्ट करत ट्रेलर आवर्जून बघा असा इशारा दिला आहे. या व्हिडिओमध्ये तो असं सांगतो,”माझ्यासाठी अद्भुत दिवस असणार आहे. माझ्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटाचा ट्रेलर 15 तारखेला रिलीज होणार आहे. मला माहित आहे तुम्ही सगळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताय आणि मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. मी सोशल मीडियावर नसलो तरी मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचून त्याला उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. मी आतून खूप घाबरलो आहे. या चित्रपटासाठी मी सर्वस्व पणाला लावलं आहे. मला माहित नाही माझ्या आयुष्यात असा चित्रपट करायची संधी कधीही मला मिळेल. यासाठी मी घाम, रक्त, वेळ, हृदय, लिव्हर, किडनी सगळं दिलं आहे. माझी खात्री आहे तुम्हा सर्वाना हा चित्रपट आवडेल.”

आलियाने (Alia Bhatt) सुद्धा एका खास व्हिडिओतून असं सांगितलं, “हा माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट असणार आहे. आमच्यासाठी खूप मोठा क्षण आहे. मी आठवडाभर झोपू शकले नाहीये. मी स्वतः ट्रेलर 25-30 वेळा पाहिला आहे. या फिल्ममध्ये अनेक अर्थानी स्पेशल गोष्टी आहेत. खूप मेहनत वेळ सगळ्या गोष्टी पणाला लावून हा सिनेमा बनला आहे. मला अनेकदा या फिल्मबद्दल विचारणा केली गेली पण आता अखेर तुमच्यासमोर ट्रेलर येतो आहे. त्याला खूप प्रेम द्या.” अशा शब्दांत तिने चाहत्यांना ट्रेलर बघण्याबद्दल आवाहन केलं आहे.

या फिल्मसाठी कलाकारांनी किती पैसे घेतले तुम्हाला माहित आहे का?

300 कोटींच्या घरात बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी रणबीर कपूरने जवळपास 25-30 कोटी रुपये घेतले अशी माहिती समोर येत आहे. आलियाने तब्ब्ल 10-12 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जात आहे. अमिताभ बच्चन यांनी जवळपास 8-10 कोटी रुपये आकारले आहेत.

हे ही वाचा- Deepika Padukone Health Update: शुटींगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

तर नागार्जुन या साऊथ अभिनेत्याने 9-11 कोटी रुपये घेतले आहेत. डिम्पल कापडिया या अभिनेत्रीचा सुद्धा रोल या चित्रपटात असणार आहे. तिने जवळपास 1-2 कोटी रुपये भूमिकेसाठी घेतले आहेत. मौनी रॉय या अभिनेत्रीची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका यात असणार आहे. तिने यासाठी जवळपास 3 कोटी रुपये घेतले आहेत असं सांगितलं जातं.

First published:

Tags: Alia Bhatt, Amitabh Bachchan, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Ranbir kapoor