मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Deepika Padukone Health Update: शुटींगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

Deepika Padukone Health Update: शुटींगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

Deepika Padukone Health Update: शुटींगदरम्यान  दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

Deepika Padukone Health Update: शुटींगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

अभिनेत्री दीपिका पादुकोन ( Deepika Pasukone) हिची सिनेमाच्या शुटींगदरम्यान अचानक तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या तब्येतीची बातमी कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केलीय.

मुंबई, 14 जून: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन ( Deepika Padukone) संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हैद्राबाद येथे शुटींग दरम्यान दीपिका पादुकोनची तब्येत  बिघडल्यानं तिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.  शुटींगदरम्यान हृदयाचे ठोके वाढल्यानं दीपिका अस्वस्थ झाली त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  दीपिकावर सध्या हैद्राबादच्या कमिनेनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एबीपी हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिला हॉटेलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.  दीपिकाच्या तब्येतेसंबंधी बातमी कळताच तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केलीय.

दीपिका नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल  ( Cannes Film Festival) करुन भारतात परतली होती. दुबईवरुन परत येताच दीपिकाने 'प्रोजेक्ट के' या तिच्या नव्या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली. सिनेमात दीपिकाबरोबर साऊथ सुपरस्टार प्रभास काम करत आहे. हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटी येथे सिनेमाचं शुटींग सुरू होतं.  तेव्हाच अचानक दीपिकाची तब्येत बिघडली.

हेही वाचा - Anupam Kirron Kher Love Story: एकमेकांचे Best Friend असूनही दुसऱ्यांशीच केलं लग्न; मूल झाल्यावर कळलं पहिलं प्रेम

मिळालेल्या माहितीनुसार, 12 जूनला रामोजी फिल्म सिटीमध्ये शुटींग सुरू असताना अचानक दीपिकाला भिती वाटू लागली तिच्या हृदयाचे ठोके वाढले. त्यानंतर सिनेमाच्या संपूर्ण टीमनं तिला तात्काळ रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी दीपिकाचं चेकअप करुन तिला डिस्चार्ज दिला आहे. पुढच्या उपचारांसाठी दीपिका मुंबईला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.

दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर ती पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. तिने याआधी शाहरुख खानसोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख आणि दीपिकाचा हा चौथा चित्रपट असेल.

मागील महिन्यात दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत होती. 11 दिवसांच्या कान्स फिल्म फेस्टिव्हमधअये दीपिकानं ज्युरी म्हणून जबाबदारी सांभाळली.  कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिकाच्या फॅशन ब्युटीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तिच्या भन्नाट लुक्समुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केलं.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Deepika padukone, Prabhas