मुंबई 13 सप्टेंबर : रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रचंड टीका, वाईट रिव्ह्यूनंतरही ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहे. पहिल्या तीन दिवसातच सिनेमानं 112.20 करोडची कमाई केली आहे. भारतात 124.49 कर वर्ल्ड वाइल जवळपास 226.75 करोडचं कलेक्शन केलं आहे. सोशल मीडियाच्या बायकॉट बॉलिवूड ट्रेंडमध्ये सिनेमा अडकला, नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात निगेटीव्ह प्रतिसाद सिनेमाला मिळत राहिला मात्र तरीही सिनेमानं चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ 3 दिवसात सिनेमानं 5 रेकॉर्ड तोडलेत. इतकंच नाही तर साऊथमध्येही सिनेमा हिट ठरतोय नॉन हॉलिडे ओपनिंग विकेंड ब्रह्मास्त्र या आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसात नॉर्मल विकेंडमध्ये रिलीज झाला. तरीही सिनेमानं 124.49 करोड कमावले. 3 दिवसांच्या नॉर्मल विकेंडला चांगलं कलेक्शन करणारा ब्रम्हास्त्र हा चौथा हिंदी सिनेमा आहे. या आधीKGF 2, RRR, वॉर सारख्या सिनेमांनी तगडी कमाई केली होती. हेही वाचा - Brahmastra Box Office Collection: चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, ब्रह्मास्त्रची जबरदस्त कमाई हिंदीमध्ये टॉप ओपनिंग विकेंड सिनेमा रिलीज झाल्याच्या पहिल्या विकेंडमध्ये शानदार कलेक्शन करणारा ब्रम्हास्त्र हा दहाव्या क्रमांकावर आहे. 1-KGF 2- 193.99 करोड रुपये 2-सुल्तान - 180.36 करोड रुपये 3-वॉर - 166.25 करोड रुपये 4-भारत - 150.10 करोड रुपये 5-प्रेम रतन धन पायो - 129.77 करोड रुपये 6-बाहुबली 2 - 128 करोड रुपये 7-ठग्स ऑफ हिंदुस्तान - 123 करोड रुपये 8-संजू- 120.6 करोड रुपये 9-टायगर जिंदा है - 114.93 करोड रुपये 10-ब्रह्मास्त्र - 112.30 करोड रुपये 11-पद्मावत 109 करोड रुपये हेही वाचा - Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका पादुकोण बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट एका दिवसात बेस्ट कमाई बॉक्स ऑफिसवर एका दिवसात बंपर कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर हा सिनेमा होता. आता या लिस्टमध्ये ब्रह्मास्त्र आठव्या क्रमांकावर आहे. 1- वॉर- 53.35 करोड रुपये 2-ठग्स ऑफ हिंदुस्तान -52.25 करोड रुपये 3-संजू- 46.71 करोड रुपये 4-टायगर जिंदा है - 45.53 करोड रुपये 5- हॅप्पी न्यू इअर - 44.97 करोड रुपये 6-दंगल - 42.41 करोड रुपये 7-भारत- 42.30 करोड रुपये 8- ब्रह्मास्त्र - 41.20 करोड रुपये 9- बजरंगी भाईजान - 38.75 करोड रुपये हेही वाचा - Brahmastra Box Office Collection Day 3: ब्रम्हास्त्रवर नाही बायकॉट बॉलिवूडचा कोणताच परिणाम; 3 दिवसात मोडले रेकॉर्ड टॉप ओपनिंग विकेंड (इंडिया) पहिल्या 3 दिवसात ब्रह्मास्त्रनं रेकॉर्ड ब्रेक केलाय. या वर्षात 380.15 करोड रुपये कमावून KGF2 टॉपवर आहे. तर RRR सिनेमानं 324 करोड कमावले होत. त्यानंतर आता ब्रह्मास्त्रने 124.49 करोड कमावले आहेत. साऊथमध्ये बॉलिवूड सिनेमाची दमदार कमाई ब्रह्मास्त्र हा सिनेमा चांगली कमाई करतोय. भारतातही साऊथमध्ये बॉलिवूड सिनेमांची चलती पाहायला मिळत आहे. केवळ साऊथमधील ब्रह्मास्त्रची कमाई पाहायला गेलं तर कर्नाटक - 8.5 करोड रुपये आंध्र प्रदेश\ तेलंगणा - 19.2 करोड रुपये तमिळनाडू - 5.3 करोड रुपये केरळ - 1.65 करोड रुपये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.