जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Brahmastra Box Office Collection: चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, ब्रह्मास्त्रची जबरदस्त कमाई

Brahmastra Box Office Collection: चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, ब्रह्मास्त्रची जबरदस्त कमाई

Brahmastra Box Office Collection: चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, ब्रह्मास्त्रची जबरदस्त कमाई

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे. या चित्रपटाला सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13  सप्टेंबर-   रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे. या चित्रपटाला सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतरसुद्धा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला होता. असं म्हटलं जात आहे की, ‘ब्रह्मास्त्र’ने दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवरील गेल्या काही महिन्यांचा हिंदी चित्रपटांचा दुष्काळ संपवला आहे. या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री पडद्यार हिट ठरताना दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा हायेस्ट नॉन-हॉलिडे ग्रॉसर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने आठवड्याच्या सुरुवातीला वर्ल्ड वाईड 225 कोटींचा जबरदस्त गल्ला जमवला आहे. सोबतच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढत यादीत आपल्या नावाचा समाविष्ट केला आहे. आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘ब्रह्मास्त्र’च्या वर्ल्ड वाईड कलेक्शनची माहिती दिली आहे. वीकेंडच्या दमदार कमाईनंतर सर्वांचं लक्ष ‘ब्रह्मास्त्र’ च्या चौथ्या दिवसाच्या म्हणजेच सोमवारच्या कमाईकडे लागून होतं. या चित्रपटाने सोमवारीसुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान फटकेबाजी केली आहे. या चित्रपटाने सोमवारीसुद्धा प्रत्येक भाषेत 17 ते 18 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सोमवारी एकूण बॉक्स ऑफिस क्लेक्क्शन 137 ते 139 कोटी इतकं झालं आहे. असं सांगण्यात येत आहे की, लोकांच्या मागणीवरुन रात्री 2. 30 ला सुद्धा ‘ब्रह्मास्त्र’ चे स्पेशल शो ठेवण्यात आले होते.

जाहिरात

(हे वाचा: Brahmastra Box Office Collection Day 3: ब्रम्हास्त्रवर नाही बायकॉट बॉलिवूडचा कोणताच परिणाम; 3 दिवसात मोडले रेकॉर्ड **)** ‘ब्रह्मास्त्र’साठी अयान मुखर्जीने तब्बल 9 वर्षे मेहनत घेतली आहे. हा चित्रपट खास बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा प्रचंड वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भेट झाली होती. त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.चित्रपट रिलीजपूर्वीच त्यांनी लग्नदेखील केलं. आणि आता हे सेलिब्रेटी कपल आईबाबादेखील बनणार आहेत. त्यामुळे या दोघांसाठी हा चित्रपट फारच खास आहे.आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन,नागार्जुन आणि मौनी रॉय यांचासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.तसेच शाहरुख खानचासुद्धा दमदार कॅमिओ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात