मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये दीपिका पादुकोण बनणार रणबीरची आई? 'या' सीनवरून मिळाली मोठी हिंट

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये दीपिका पादुकोण बनणार रणबीरची आई? 'या' सीनवरून मिळाली मोठी हिंट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 सप्टेंबर-   आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना रणबीर आणि आलियाला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागून होती. ही प्रतीक्षा आता संपुष्ठात आलिया आहे. चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग आहे. पहिला भाग रिलीज होताच चाहत्यांना आता दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.

'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागाचं नाव 'ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा' असं आहे. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव 'ब्रह्मास्त्र भाग 2- देव' असं आहे. चित्रपटाचा पहिला भाग हा शिवा (रणबीर कपूर ) नावाच्या मुलावर अर्थातच आधारित आहे.त्याच्याकडे काही दैवी शक्ती असतात. त्याच्याकडे एक 'अस्त्र' असतं. त्या शक्तीच्या आधारे त्याला पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. तो या शक्तीच्या आधारे या जगाचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये दडलेल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागाचा शेवट फारच रंजक आहे. कारण यामध्ये दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केलेली आहे.

'ब्रह्मास्त्र'चा पहिला भाग पाहणाऱ्यांना आता याच्या दुसऱ्या भागाची ओढ लागली आहे. दुसऱ्या भागात नेमकं काय घडणार. आणि कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' मध्ये मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोणची निवड केली जाऊ शकते.असं सांगितलं जात आहे.बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारणार आहे. कारण 'ब्रह्मास्त्र पार्ट 1' मधील एका दृश्यात ती अस्पष्टपणे दिसून आली आहे.

(हे वाचा:Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी )

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात मोठ्या प्रमाणात VFX ची दृश्ये पाहायला मिळाली आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर शिवा तर आलिया भट्ट ईशाच्या पाहायला मिळत आहे. सोबतच या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Ranbir kapoor