Home /News /entertainment /

सेल्फी घेत असतानाच अर्जुन कपूरला मलायकाने केलं Kiss; पाहा PHOTO

सेल्फी घेत असतानाच अर्जुन कपूरला मलायकाने केलं Kiss; पाहा PHOTO

New Year ला मलायका अरोरानेच हा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मलायका कुटुंबाबरोबर गोव्यात गेलेली असताना अर्जुनही दाखल झाला आणि...

  मुंबई, 1 जानेवारी : मॉडेल, अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. अर्जुन आणि मलायका यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली गेल्या वर्षीच दिली होती. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मलायका आणि अर्जुन कपूर हे कपल पुन्हा चर्चेत आलं आहे. अर्जुन कपूर सेल्फी घेत असताना मलायकाने त्याला किस केलं. तिने स्वतःच हा फोटो instagram वर शेअर केला आहे. मलायका अरोरा आपल्या सगळ्या कुटुंबासह नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात आहे. 31 डिसेंबरला अर्जुन कपूरही गोव्यात दाखल झाला. मलायका आणि अर्जुनचा हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मलायकाने या फोटोखाली Sun,star,light,happiness.......2020✨ अशी कॅप्शन लिहिली आहे. मलायका तिची बहीण अमृता अरोरा आणि संपूर्ण कुटुंब गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी गेले आहेत. अर्जुनही त्यांच्यात सामील झाला.
  View this post on Instagram

  Sun,star,light,happiness.......2020✨

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे या संपूर्ण वर्षातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल ठरलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो त्यानंतर सोशल मीडियावरुन दिलेली नात्याची कबुली आणि एकमेकांबद्दल उघडपणे केलेली वक्तव्य सर्वच गोष्टींमुळे वर्षभर ही जोडी चर्चेत राहिली.

  हेही पाहा - लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

  पण आता पुन्हा एकदा या दोघांच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत आणि आता कारण आहे ते अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडीलांना भेटायला जाण्याचं. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चां पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा तिच्या घरी जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. 2017 मध्ये अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर मलायकानं अर्जुनसोबत मैत्री केली. लवकरच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दुसरीकडे अरबाज जॉर्जिया अँड्रीयानीबरोबर रिलेशिपमध्ये आहे. ------------------------------ अन्य बातम्या तणावमुक्त राहायचंय? मग फॉलो करा इम्रान हाश्मीचा सोपा डाएट प्लान कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते... अमिताभ बच्चन-अनुराग कश्यप यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, वाचा काय आहे कारण मराठी अभिनेत्यानं घातली फाटकी जीन्स, आजीने झाप झाप झापलं; VIDEO VIRAL
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Arjun kapur, Malaika, Relationship

  पुढील बातम्या