अमिताभ बच्चन-अनुराग कश्यप यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, वाचा काय आहे कारण

अमिताभ बच्चन-अनुराग कश्यप यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, वाचा काय आहे कारण

अनुराग कश्यपनं ज्याप्रकारे अमिताभ यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे त्यांचं ट्वीट सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन नेहमीच सोसल मीडियावर सक्रिय असतात. खासकरुन ते ट्विटरवरून नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतात. सध्या त्यांचं एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. नव्या वर्षाचं स्वागत करताना बिग बींनी एक ट्वीट केलं आहे. मात्र त्यावर निर्माता अनुराग कश्यपनं ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे त्यांचं हे ट्वीट सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.

अमिताभ यांनी नवीन वर्षाचं स्वागत करताना लिहिलं, ‘नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. जास्त टेन्शन घेऊ नका. जास्त नाही फक्त 19-20(उन्नीस-बीस)चा फरक आहे’ अमिताभ यांच्या या ट्वीटवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिलं, यावेळी उन्नीस-बीसचा फरक नाही आहे सर यावेळी फरक खूप मोठा आहे. सध्या कृपया तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या वाट्याचं काम तुम्ही 90 व्या दशकातच केलं आहे.

अनुरागनं पुढे लिहिलं, तेव्हा पासून तुमच्यातला बच्चन आम्हाला घेऊन फिरत आहे. यावेळी समोर गब्बर असो वा लायन किंवा मग शाकाल... आम्ही पण बघू. अनुरागच्या या ट्वीटवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मागच्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप CAA विरोधी ट्विट केल्यानं चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून अनुराग सरकारवर टीका करताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचे एक दोन नाही तर तब्बल 4 सिनेमे येत्या वर्षभरात रिलीज होणार आहेत. यात ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘गुलाबो-सिताबो’ या सिनेमांचा समावेश आहे. चेहरे या सिनेमात ते इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर ब्रह्मास्त्रमध्ये त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या