जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते...

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते...

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते...

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला. 37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं आहे. पण कुशलचे नातेवाईक मात्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर आता त्याची एक्स गर्लफ्रेंडनं सुद्धा याविषयी दुःख व्यक्त केलं. स्पॉटबॉय-ई ने दिलेल्या वृत्तानुसार कुशलची एक्स गर्लफ्रेंड मेघना नायडू हिनं सांगितलं, ‘मला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसला कारण तो असं काही करेल असं कदीच वाटलं नव्हतं. मला त्याचं कुटुंब आणि मुलासाठी खूप वाईट वाटतं. या कठीण परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देव त्यांना देवो एवढीच आशा मी व्यक्त करेन.’ जेव्हा मेघनाला विचारण्यात आलं की, ‘2010 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर ती त्याला कधी भेटली होती. यावर उत्तर देताना मेघना म्हणाली, 10 पेक्षा जास्त वर्षांच्या काळात आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. त्यामुळे मला आठवतही नाही की त्याला शेवटची कधी भेटले होते. पण ज्याप्रकारे त्यानं स्वतःचं जीवन संपवलं त्यामुळे खूप दुःखी आहे. मला या गोष्टीचं दुःख जास्त आहे की मानसिक ताणावामुळे माणूस कशाप्रकारे आपलं जीवन संपवू शकतो.’ आत्महत्या करण्यापूर्वी मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं लिहिली पोस्ट

जाहिरात

कुशलच्या मृत्यूनंतर एकीकडे DCP नं सांगितलं की त्यानं त्याच्या सुसाइड नोटमध्ये कोणालाही माझ्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवू नका असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काही सूत्रांच्या माहितीनुसार कुशल अर्थिक तंगीशी सामना करत होता. त्याच्याकडे काम नव्हतं. तसेच प्रोफेशनल लाइफमधील समस्यांचा परिणाम त्याच्या पर्सनल लाइफवर होत होता. हीच गोष्ट त्याच्या मृत्यूचं कारण ठरली. सनई-चौघडे वाजणार? अर्जुन कपूरनं घेतली मलायकाच्या आईची भेट, PHOTO VIRAL कुशलनंच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यानं Audrey Dolhen हिच्याशी 2015 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘जिंदगी विन्स’ या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं. अर्पिता खान झाली आई, सलमानला मिळालं ‘बेस्ट बर्थडे गिफ्ट’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात