लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

माधुरी दीक्षित नेनेचा बिकिनी सेल्फी व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 05:08 PM IST

लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

मुंबई, 19 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची लोकप्रियता आजही तेवढीच असलेली पाहायला मिळते. आजही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. माधुरी सुद्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिनं नुकताच तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान माधुरीनं लग्नाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षितनं करवाचौथच्या दिवशी पती श्रीराम नेने यांच्यासोबत एक रोमँटिक सेल्फी शेअर केला. माधुरी आणि तिच्या पतीचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये माधुरी राम यांना किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना माधुरीनं एक पोस्ट सुद्धा लिहिली आणि या पोस्टमध्ये तिनं लग्नाच्या 20व्या वाढदिवसाला पती रामसाठी खास मेसेज सुद्धा लिहिला.

 

Loading...

View this post on Instagram

 

Soulmates forever @drneneofficial #20Years

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करताना माधुरीनं लिहिलं, 'जन्मोजन्मीचे सोबती. लग्नाचा 20 वा वाढदिवस' माधुरी आणि राम नेने एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत. राम हे व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यामुळे ते नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करतात.

श्रीराम नेने माधुरी सोबत क्वचितच एखाद्या आवॉर्ड फंक्शन आणि पार्टीमध्ये दिसतात. माधुरी आणि राम यांनी 17 ऑक्टोबर 1999मध्ये लग्न केलं होतं. त्यांना अरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. माधुरी काही दिवसांपूर्वी डान्स रिअलिटी शो 'डान्स दिवाने'मध्ये परिक्षक म्हणून दिसली होती.

============================================================

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...