मुंबई, 30 जून: बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi Husband Died of Heart Attack) हिचे पती राज कौशल यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू (Raj Kaushal Death) झाल्याची माहिती मिळते आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी ही घटना घडली. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. राज यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
#BREAKING : Actress #MandiraBedi 's husband #RajKaushal passed away earlier this morning due to heart attack.. He was 49 and a Movie Producer..
— Ramesh Bala (@rameshlaus) June 30, 2021
Shocking.. Condolences.. May his soul RIP! pic.twitter.com/7sCPoHz4kD
राज यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. दिग्दर्शक-निर्माता ओनिर यांनी देखील जवळचा सहकाही गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट- My Brother Nikhil राज यांच्यासह केला होता, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Gone too soon. We lost Film maker and Producer @rajkaushal1 this morning. Very Sad. He was one of the producers of my first film #MyBrotherNikhil. One of those few who believed in our vision and supported us. Prayers for his soul. pic.twitter.com/zAitFfYrS7
— iamOnir (@IamOnir) June 30, 2021
राज कौशल एक निर्माता आणि स्टंट डायरेक्टर होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदिरा आणि दोन मुलं- वीर आणि तारा असा परिवार आहे. राज यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी के लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मुकूल आनंद यांच्या निवासस्थानी त्यांची आणि मंदिरा बेदी यांची पहिली भेट 1996 साली झाली होती. 14 फेब्रुवारी 1999 या दिवशी त्यांनी लग्न केलं.