प्रसिद्ध दिग्दर्शक राज कौशल यांच आज सकाळी पाहटेच्या सुमारास निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं. नेहमी आनंदी असणारे राज यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
2/ 9
दोनच दिवसांपूर्वी राज हे पत्नी मंदीरा बेदी आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसले होते. त्यात क्रिकेटर झहीर खान, सागरीका घाटगे, नेहा धुपिया, आंगद बेदी हे ही सामील होते.
3/ 9
राज हे एक आनंदी व्यक्तिमत्तव होतं. त्यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये ते आनंदी आणि हसतमुख दिसायचे.
4/ 9
रविवारीच त्यांच्या घरी झालेल्या पार्टीत ते अगदी आनंदी होते. तर सगळ्यांसोबत चांगला वेळही घालवत होते. पण बुधवारी सकाळी अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
5/ 9
पत्नी अभिनेत्री मंदीरा बेदीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पतीच्या अचानक जाण्याने तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
6/ 9
राज यांच्या जाण्याने मंदीराच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम होतं.
7/ 9
मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत. तर एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे.
8/ 9
सोशल मीडियावर राज हे नेहमीच त्यांचे पार्टीचे फोटो शेअर करायचे.
9/ 9
राज यांच्या निधनाने सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.