मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bollywood Drugs Case : दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक; 200 किलोग्रॅम गांजा जप्त

Bollywood Drugs Case : दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक; 200 किलोग्रॅम गांजा जप्त

दियाचा एक्स मॅनेजर रहिला फर्नीचरवालासह (Rahila Furniturewala) त्याची बहिण आणि इतर दोघांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. या दरम्यान एनसीबीने मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

  • Published by:  Karishma

मुंबई, 10 जानेवारी : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्स प्रकरणात आपल्या तपासाची व्याप्ती वाढवत आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनंतर या प्रकरणात आता एनसीबीने अभिनेत्री दिया मिर्जाच्या (Dia Mirza) एक्स मॅनेजरला अटक केली आहे. दियाचा एक्स मॅनेजर रहिला फर्नीचरवालासह (Rahila Furniturewala) त्याची बहिण आणि इतर दोघांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. या दरम्यान एनसीबीने मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका ब्रिटिश व्यवसायिक करण सजदानीलाही अटक केली आहे. दोन्ही बहिणी ड्रग्स व्यवसायात त्याची मदत करत असल्याचा आरोप आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे वेस्टमध्ये एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला आहे.

(वाचा - मोलकरणीच्याच भूमिका मिळतात'; Nude Photo मुळे चर्चेत असलेल्या वनिता खरातची खंत)

याच दरम्यान करण सजदानीच्या घरुन मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. येथून माहिती मिळाल्यानंतर एनसीबीची चौकशी दियाच्या एक्स मॅनेजर रहिला फर्नीचरवालाकडे पोहचली. यात तपासात रहिला फर्नीचरवाला आणि त्याच्या बहिणीकडून गांजा जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने एकूण 200 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.

(वाचा - सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठं नाव गजाआड, मोठा खुलासा होणार?)

दरम्यान, यापूर्वीही बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी एनसीबीकडून अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. यात दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान, अर्जुन रामपाल सामिल आहेत. गांजा बाळगण्याप्रकणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती.

First published:

Tags: Bollywood News, Sushant Singh Rajput