मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'....फक्त आई आणि मोलकरणीच्याच भूमिका मिळतात'; Nude Photo मुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातची खंत

'....फक्त आई आणि मोलकरणीच्याच भूमिका मिळतात'; Nude Photo मुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातची खंत

वनिता खरातनं (Vanita Kharat Bold Nude Photo Shoot) केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर तिच्या वाट्याला कौतुक आणि टीका दोन्ही आलं. तिनं आता यामागची भूमिका सविस्तर मांडली आहे.

वनिता खरातनं (Vanita Kharat Bold Nude Photo Shoot) केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर तिच्या वाट्याला कौतुक आणि टीका दोन्ही आलं. तिनं आता यामागची भूमिका सविस्तर मांडली आहे.

वनिता खरातनं (Vanita Kharat Bold Nude Photo Shoot) केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर तिच्या वाट्याला कौतुक आणि टीका दोन्ही आलं. तिनं आता यामागची भूमिका सविस्तर मांडली आहे.

मुंबई, 6 जानेवारी : अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) सध्या सतत हेडलाईन्समध्ये झळकते आहे. यावेळी याला कारण ठरलं ते तिचं एक बोल्ड फोटोशूट. न्यूड फोटोशूट. मराठमोळ्या वनिता खरात हिनं नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तिनं केलेलं न्यूड फोटोशूट (nude photo shoot) सोशल मीडियामध्ये (social media) शेअर केलं. बॉडी पॉझिटीव्हीटीचं (body positivity) समर्थन करण्यासाठी हे केल्याच्या भावनाही तिनं फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मांडल्या. ही मराठी अभिनेत्री बॉलीवूडला (Bollywood) माहीत आहे, ती 'कबीर सिंग' (Kabir Singh) सिनेमातील शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) घरी काम करणारी 'हाऊस मेड' म्हणून.

वनितानं या फोटोशूटमागची भूमिका आता सविस्तर मांडली आहे. ती सांगते, 'या शूटच्या माध्यमातून मला एक विशिष्ट कल्पना ठळक करायची होती. ती कल्पना म्हणजे, आपण सगळेच सुंदर (beautiful) आहोत. त्याचं किंवा तिचं आकारमान, वजन यावरून सौंदर्य नाहीच जोखलं जाऊ शकत. एखाद्या वजन जास्त असलेल्या मुलीनं आपण कसे दिसतो, कुठले कपडे आपल्यावर बरे दिसतील याविषयी सतत का चिंतेत असावं? अगदी पुरुषही वाढलेल्या वजनामुळं अस्वस्थ असल्याचं मी बघितलं आहे. अर्थात बायकांची संख्या यात जास्त आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून बॉडी पॉझिटीव्हीटीच्या चळवळीत काहीतरी योगदान द्यायचं होतं.'टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तिनं सांगितलं.

पुढं ती म्हणाली, 'अनेकांनी माझ्या या कृतीमागच्या हेतूबाबत प्रश्न उपस्थित केले. अशा लोकांना मला हेच सांगायचं आहे, की ही ती अवस्था आहे ज्यात आपला जन्म होतो. नग्नतेला अश्लील का म्हणून मानायचं?'

या इंडस्ट्रीत (industry) कधी भेदभावाला सामोरं जावं लागलं का या प्रश्नाचं उत्तर देताना ती सांगते, 'मला इतरांचं माहीत नाही पण माझ्याबाबत बोलायचं तर मला सतत आई, काकू किंवा घरकाम करणाऱ्या बाईच्याच (house maid) भूमिकांसाठी विचारणा केली जाते. पण ही फिल्म इंडस्ट्रीची समस्याच आहे. बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळ आणि फिल्म इंडस्ट्रीच्या मर्यादा यात गल्लत करायला नको.

First published:

Tags: Bollywood, Shahid kapoor, Social media