मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : मलायकाचा एअरपोर्ट लुक व्हायरल; प्रिटेंड ड्रेसमध्ये दिसत होती खूपच ग्लॅमरस

VIDEO : मलायकाचा एअरपोर्ट लुक व्हायरल; प्रिटेंड ड्रेसमध्ये दिसत होती खूपच ग्लॅमरस

अनेकदा जिम किंवा योगा क्लासच्या बाहेर दिसणाऱ्या मलायका अरोराला यावेळी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये व हटके लुकमध्ये दिसली.

अनेकदा जिम किंवा योगा क्लासच्या बाहेर दिसणाऱ्या मलायका अरोराला यावेळी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये व हटके लुकमध्ये दिसली.

अनेकदा जिम किंवा योगा क्लासच्या बाहेर दिसणाऱ्या मलायका अरोराला यावेळी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये व हटके लुकमध्ये दिसली.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 17 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर नेहमी फॅशन सेन्स, फिटनेस कधी कपड्यावरून तर कधी चालण्यावरून चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पापाराझींची ती आवडती आहे. जिमपासून ते लंच-डिनरपर्यंत, पापाराझी मलायकाला फॉलो करत असतात. तिचा प्रत्येक लुक कॅमेरात कैद करत असतात. नेटकरी बऱ्याचवेळा मलायकाच्या लुकची तर कधी तिच्या फिटनेस आणि फिगरची प्रशंसा करताना दिसतात. अनेकदा जिम किंवा योगा क्लासच्या बाहेर दिसणाऱ्या मलायका अरोराला यावेळी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये व हटके लुकमध्ये दिसली. कारमधून मलायकाने पाय खाली ठेवताच नेहमीप्रमाणे पापाराझींचे कॅमेरे मलायकाकडे वळले. मलायकाने देखील त्यांना निराश न करता त्यांच्यासाठी पोज दिली. मुंबई एअरपोर्टवर मलायका अरोरा यावेळी कॅज्युअल लुकमध्ये दिसली. मलायकाने पांढऱ्या रंगाच्या स्पोर्ट्स ब्रावर प्रिंटेड कोट परिधान केला होता. सोबत काळ्या रंगाचा मास्कही घातला होता. या लुकमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत होती. मलायका गाडीतून उतरताच एका महिला चाहतीने तिच्याकडे सेल्फीसाठी विनंती केली. यावर तिने आपल्या चाहतीला नाराज न करता जवळ घेत सेल्फी दिला. एअरपोर्टमध्ये जाण्यापूर्वी मलायकाने मास्क काढला आणि पापाराझींसाठीही हलकीशी स्माईल देत पोजही दिली.
मलायकाचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मलायकाचा हा हटके लुक चाहत्यांना भलताच आवडला आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका कपिल शर्माच्या शोमध्ये इंडियाज बेस्ट डान्सर' या शोच्या प्रमोशनासाठी गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासोबत सेटवर आली होती. यावेळी सेटवर मलायकाच्या वॉकची चर्चा रंगली असल्याचे दिसली. वाचा : Bigg Boss 15: इशान-मायशाचे 'ते' चाळे पाहून भडकला सलमान; सुनावले खडेबोल यासंबंधीचा प्रश्न कपिलने गीता कपूरला विचारला होता. यावर गीताने मलायकाच्या चालण्याची कॉपी करून दाखवली होती. मलायका सकाळी वॉकला कशी जाते, तसंच ती चालताना कशी चालते. गीताने मलायकाची केलेली मिमिक्री पाहून सर्वंजण जोराने हसू लागले. मलायका अरोरा देखील स्वतःचे हसू आवरू शकली नाही. गीताच्या या कृतीमुळे तिचा चेहरा लाजेने गुलाबी झाला होता.इंडियाज बेस्ट डान्सर' या रिअॅलिटी टीव्ही शोचा पुढील सीझन लवकरच सुरू होणार आहे आणि या सीझनची टॅगलाईन 'बेस्ट का नेक्स्ट' अशी आहे. या शोचा पहिला सीजन 2020 मध्ये आला जो खूप यशस्वी झाला आणि आता या शोचा दुसरा सीझन येणार आहे. वाचा : सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून कोणीच देऊ शकत नाही 'डायमंड', बॉयफ्रेंड देखील नाही ; हे आहे कारण.. मलायका अरोरा दररोज सकाळी तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाते आणि बऱ्याच वेळा तिचा स्टायलिश वॉक पापाराझी कॅमेऱ्यात कैद करत असतात. अलिकडेच मलायका अरोरा तिच्या चालण्यामुळे चर्चेत आली होती आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर तिची खिल्ली देखील उडवली होती.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Malaika arora

पुढील बातम्या