मुंबई, 17 ऑक्टोबर : पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या (Bigg Boss 15) घरातील दोन सदस्य एकमेकांच्या प्रेमाच पडल्याचा प्रकार ‘बिग बॉस’ (Bigg Boss) च्या इतिहासत पहिल्यांदाच घडला आहे. पहिल्या आ़ठवड्यात स्पर्धक एकमेकांविषयी जाणून घेतात व मैत्री करतात. मात्र मायशा अय्यर (Miesha Iyer) आणि इशान सहगल (Ieshaan Sehgaal) मात्र पहिल्याच आठवड्यात सिक्स मारत लव्हस्टोरीला सुरूवात केली. ही दोघं या शोमध्ये फक्त एकमेकांसोबत वेळ घालवण्याच्या पलीकडेही त्यांच्यातील जवळीकता वाढली आहे. या दोघांनी कॅमेरांची पर्वा न करता घरातील लोकांपासून लपून एकमेंकाना किस केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यानंतरही अनेकदा या जोडीला कॅमेरासमोर अश्लील चाळे करताना स्पॉट करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर यंदाच्या पर्वात स्पर्धकांनी अश्लीलतेच्या सीमा पार केल्याचे आरोपही प्रेक्षकांनी केले आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विकेंड वॉरमध्ये सलमान खानने (salman khan) मायशा आणि इशानची चांगलीच शाळा घेतली आहे. सलमानने शनिवारी झालेल्या विकेंड वॉरमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला चांगलेच धारेवर धरले. प्रत्येकाला त्याच्या चुका दाखवून त्यांना खडे बोल सुनावले. यावेळी त्याने मायशा आणि इशान यांच्यातील Intimacyवरही मत मांडलं. “तुमच्यातील रोमान्स एका नॅशनल टीव्हीवर पाहणं प्रेक्षकांना कसं वाटतं याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का? जर भविष्यात तुम्ही परत एकत्र आला नाहीत तर पुढे काय होईल याचा अंदाज देखील आहे का तुम्हाला?",असा प्रश्न सलमान खानने या दोघांना यावेळी विचारला. वाचा : सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून कोणीच देऊ शकत नाही ‘डायमंड’, बॉयफ्रेंड देखील नाही ; हे आहे कारण.. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने मायशा आणि इशानला त्यांच्या वागणुकीवरून चांगलेच फटकारले. तुमची प्रत्येक गोष्ट या घरात कॅमेरात कैद होत असल्याचे सलमान खानने यावेळी आठवण करून दिली. तसेच हे व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहेत. दोघांच्यातील नातं चालू शकले नाही किंवा दोघांच लग्न वेगवेगळ्या ठिकाणी झालं तर भविष्यात तुम्हालाच अडचणींचा सामना कराव लागेल. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे देखील सलमान खानने यावेळी सांगितलं. हे सगळं नॅशनल टीव्हीर दाखवणं योग्य नसल्याच देखील सलमान खानने यावेळी सांगितलं व दोघांची चांगलीच कान उघडणी केली.
मायशा तिच्या केवळ लव्हस्टोरीमुळेच नाही तर तिच्या गैरवर्तनामुळे तसेच स्मोकिंगमुळे देखील ती चर्चेत आहे. ध्रुमपाना करणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं सलमान खानने यावेळी मायशाला सांगितलं. पण ते कुठ करायचं हे तुला समजले पाहिजे. सलमानने मायशाला समजावून सांगितले की स्पर्धकांना शिव्या देणे चुकीचे आहे. सलमानने मायशाला सुनावल्यानंतर ती काहीशी नाराज झाली होती नंतर ती रडतानाही दिसली.