मुंबई, 21 नोव्हेंबर: लोकप्रिय मराठमोळी टीव्ही अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीने (Vedangi Kulkarni) काल 20 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या थाटात लग्न **(vedangi kulkarni marriage )**केलं आहे. रॉयल एन्ट्री करत वेदांगीचे मंडपात आगमन झाले होते त्यावेळी पिवळ्या रंगाच्या साडीतील तिचं रूप अधिकच खुलून आलेलं दिसलं. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पेशवाई थाटात वेदांगी आणि अभिषेक यांचा विवाह सोहळा पार पडला. वेदांगीच्या नवऱ्याचे नाव अभिषेक तीळगूळकर असे आहे. अभिषेकने ऑस्ट्रेलियातून एमबीएच शिक्षण पुर्ण केले आहे. कोण आहे वेदांगी कुलकर्णी? वेदांगी कुलकर्णी ही मराठी मालिका अभिनेत्री आहे तसेच ती उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. अभिनय क्षेत्रात वेदांगीचे पाऊल ओघानेच पडले असे म्हणायला हरकत नाही. कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर ती झी वाहिनीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रियालिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमधून वेदांगीने आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या रियालिटी शो नंतर तीला मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. मालिकांमधून सहनायीका साकारत असतानाच “साथ दे तू मला ” या मालिकेतून मुख्य भूमिकेसाठी तिला विचारण्यात आलं. या भूमिकेमुळे वेदांगीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. वाचा :VIDEO: नवी मालिका ‘देवमाणूस 2’ लवकरच….प्रोमो व्हायरल अभिनयासोबत वेदांगीने नृत्य सादर करून अनेक बक्षिसं मिळवली आहेत. वेदांगी कुलकर्णी ही मूळची मुंबईची डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. वेदांगी मुंबईत “व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी” चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.
स्टार प्रवाह वरील “साथ दे तू मला” या मालिकेतून प्राजक्ताची प्रमुख भूमिका तिने साकारली होती. लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटक तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली. सध्या वेदांगी सोनी मराठी वाहिनीवर कुसूम मालिकेत कुसुमची वहिनी म्हणजेच मृदुलाचे पात्र साकारत आहे.