नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: बी टाउन (Bollywood) आणि क्रिकेट (Cricket) जगतात क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे, अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि क्रिकेट विराट कोहली(Virat Kohli). विराट क्रिकेटसह आपल्या कुटूंबालाही नेहमी तितकाच वेळ देत असतो जितके खेळाला देतो. दोघेही नेहमी सोशल मीडीयावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. आताही त्यांनी एक फोटो शेअर केला जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहलीने अनुष्कासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. विराटने चष्मा लावला आहे आणि अनुष्का पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्का मेकअपशिवाय अगदी साधी दिसत आहे. दोघांचे बाँडिंग फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत विराटने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माय रॉक.” या पोस्टच्या माध्यमातून त्याने अनुष्का आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे सांगितले आहे. विराटच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
विराट आणि अनुष्कामध्ये जबरदस्त केमिस्ट्री आहे. प्रत्येक चांगल्या-वाईट काळात अनुष्का त्याच्यासोबत कणखरपणे उभी असते. अनेकवेळा क्रिकेट सामने हरल्यानंतर अनुष्कालाही विराटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना रविवारी खेळवला जाणार आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. नुकतचं टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा निरोप घेतलेल्या विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली संघाचा भाग असणार नाही. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी तो कर्णधार म्हणून संघात सामील होईल.

)







