मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 4 : बॉलिवूडच्या बाजीरावचा तेजस्विनीला फुल्ल सपोर्ट; म्हणाला, जिंकून ये आपण...

Bigg Boss Marathi 4 : बॉलिवूडच्या बाजीरावचा तेजस्विनीला फुल्ल सपोर्ट; म्हणाला, जिंकून ये आपण...

रणवीर सिंह सपोर्ट तेजस्विनी लोणारी

रणवीर सिंह सपोर्ट तेजस्विनी लोणारी

बिग बॉस मराठी 4 ची तगडी स्पर्धक तेजस्विनी लोणारी हिला थेट बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं सपोर्ट केला आहे. रणवीरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई 24 नोव्हेंबर:  कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथा सध्या खूप चर्चेत आहे. मग ते टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो  स्वत: ला सिध्द करण्याच्या प्रयत्नात घरातला प्रत्येक सदस्य आहे. सदस्यांना टास्क पेक्षा देखील कशाची भीती वाटतं असेल तर ती नॉमिनेशन मध्ये येण्याची. नॉमिनेशन पासून कसे दूर रहाता येईल याच्या प्रयत्नात सदस्य असतात. महाराष्ट्रातील आपले तमाम प्रेक्षक आपल्या लाडक्या सदस्याला वोट करून सेफ करण्याचा प्रयत्न करतात.

स्पर्धकांनी सगळ्या अडचणींवर मात करत नुकतेच घरातील तब्बल 50 दिवस पूर्ण केले आहेत. सगळ्यांसाठी हा टप्पा खूप महत्वपूर्ण होता. आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लाडका रणवीर सिंह याने बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तो सदस्य आहे तेजस्विनी लोणारी. तेजूला शुभेच्छा देणार रणवीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  रणवीरनं तेजस्विनीला शुभेच्छा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा - रोहित विकासमध्ये जबरदस्त हाणामारी; Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

रणवीर सिंह बिग बॉस मराठी फॉलो करतोय असं म्हणालायला हरकत नाही. घरातील तेजस्विनीला रणबीर सपोर्ट करत आहे. तेजूनं घरातील पन्नास दिवस पूर्ण केलं. अनेकांनी तेजस्विनी हा खेळ जिंकेल असं सांगितलं आहे. रणवीर देखील तेजस्विनीचा फॅन आहे. त्यानं तेजूला शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडीओ शुट केला आहे.  ज्यात तो म्हणतोय, 'हाय तेजू. अभिनंदन तेजू. बिग बॉसच्या घरात तू 50 दिवस पूर्ण केले आहेस.  तू खूप छान खेळत आहेस. महेश सरांना माझा सलाम. तेजू मी तुला खूप मिस करत आहे. तुझ्या उर्वरित प्रवासासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू जिंकून ये मग आपण सेलिब्रेट करूया.  तुला खूप खूप खूप प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा'.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये तेजस्विनी लोणारी ही पहिल्या पासून घरातील उत्तम स्पर्धक म्हणून खेळत आहे. घरातून बाहेर पडलेल्या सगळ्याच स्पर्धकांनी घरातील लंबी रेस का घोडा म्हणून तेजूचं नाव घेतलं आहे. तसंच बिग बॉस मराठी 3मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेला आदिश वैद्य देखील तेजूला सपोर्ट करताना दिसत आहे. घरात कोणत्याही प्रसंगी विचार करून बोलणं आणि सगळ्यांना समजून घेणं या स्वभावामुळे तेजूनं सर्वांची मनं जिंकली आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Bollywood actor, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news