‘मुंबई, 09 नोव्हेंबर : बिग बॉस मराठी सीझन 4 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. बिग बॉसच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून चार स्पर्धक बाहेर पडले आहेत. सगळ्या स्पर्धकांमध्ये जिंकण्यासाठी चुरशीची लढत आहे. काल घरामध्ये टास्कदेखील होणार आहे. आज घरामध्ये साप्ताहिक टास्क पार पडणार आहे. “सिनिअर्स v/s ज्युनिअर्स” असं या टास्कचं नाव आहे. पण आता यादरम्यान घरात रुचिरा आणि तेजस्विनीमधील वाद उफाळून येणार आहे. “सिनिअर्स v/s ज्युनिअर्स” या टास्कदरम्यान सिनिअर्सला ज्युनिअर्स टीमचा सिनेमाला जाण्याचा प्लॅन उधळून लावायचा आहे. या टास्कदरम्यानच रुचिरा आणि तेजस्विनीमध्ये किरण मानेवरून वाद झालेला पाहायला मिळाला. खरतर अक्षयने नॉमिनेशनसाठी रुचिराचं नाव घेतल्यापासून तिच्या मनात राग आहे. “विषय END” हे नॉमिनेशन कार्यादरम्यान यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले. अक्षय आणि टीम B ने मिळून रुचिराला नॉमिनेट केले. पण कुठल्याही निकषांशिवाय मला नॉमिनेट केलं असं रुचिराचं म्हणणं आहे. त्यावरूनच आता नवीन टास्कदरम्यान सुद्धा रुचिरा अशांत झालेली पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - Aastad Kale : ‘आम्ही काय बघावं हे ठरवायला…’; ‘हर हर महादेव’ विषयी स्पष्टच बोलला आस्ताद काळे बिग बॉस मराठीचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार किरण माने आणि तेजस्विनी वेगवगळ्या टीममध्ये असूनसुद्धा माने तिला कॅमेरा कुठे आहे ते सांगतात. त्यावरून अक्षयसुद्धा चिडतो. तेवढ्यात रुचिरा येऊन मानेना म्हणते, ‘‘किरण माने तुम्हाला तेजस्विनीवर विश्वास नाहीये का?’’ पण त्यावर तेजस्विनी तिला प्रत्युत्तर देत ‘ही आउट झाली म्हणून रडतेय असं म्हणते.’’ त्यावर रुचिरा म्हणते टास्कमध्ये कोण खरं आणि कोण खोटं वागतंय हे प्रेक्षकांना दिसतंय. जेव्हाही कोणी खोटं वागेल तेव्हा रुचिरा अशांत होणार’’
दरम्यान काळ रुचिरा म्हणाली होती कि, ‘‘माझे संपले नाहीयेत पेशन्स पण माझे आता हळूहळू संपत आहेत.’’ काल तिचं आणि अपूर्वाचं खटकलं होतं आणि आज तिचं किरण माने आणि तेजस्विनी सोबत वाद होणार आहेत. त्यामुळे आता या वादाचा शेवट नक्की काय होणार ते येणाऱ्या काळात ठरेल.
दरम्यान,या आठवड्यात नुकताच त्रिशूल घराबाहेर पडला आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच सेलिब्रेटींशिवाय सामान्य चाहत्याला बिग बॉसचा खेळ खेळण्याची संधी मिळाली होती. त्रिशुलने पहिल्याच दिवशी मांजरेकरांचं मन जिंकलं होतं. पण मागच्या काही दिवसात त्याचा खेळ घसरला होता. एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागतंय असं म्हणत मांजरेकरांनी त्रिशुलचा निरोप घेतला. आता या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी कोण घराबाहेर जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.