मुंबई, 24 मे: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone ) सध्या 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2022) भारताचं प्रतिनिधीत्व करतेय. कान्स फेस्टिव्हलमध्ये दीपिका ज्युरी म्हणून कामगिरी बजावत आहे. दीपिकाचे फेस्टिव्हलमधील लुक्सही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. पण केवळ चाहतेच नाही तर तिची पती अभिनेता रणवीर सिंहही (Raveer Singh) दीपिकाशिवाय जास्त काळ राहू शकत नाही. कान्स फेस्टिव्हलमध्ये व्यस्त असलेल्या दीपिकाला भेटण्यासाठी घाईघाईने निघालेल्या रणवीर सध्या नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. त्याच कारणही तसंच आहे. रणवीरचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत रणवीर एअरपोर्टरुन फार घाई घाईत बाहेर पडताना दिसतोय. विश्वास बसणार नाही पण रणवीर चक्क चड्डी आणि बनियनवर आहे. (Ranveer Singh Spot in Chadda Banyan) दीपिकाला भेटण्यासाठी आतूर झालेला रणवीर थेट चड्डी बनियवरच तिला भेटायला आला. रणवीरने पर्पल कलरची शॉर्ट्स आणि सफेद बनियन घातली आहे. एअरपोर्टवरुन रणवीर थेट बीचवरच पोहोचला. तिथे त्याने फॅन्ससोबत फोटो काढले. दीपिका आणि रणवीर यांनी बीचवर भेटण्याचा प्लान केला होता. हेही वाचा - स्कॅम 1992 च्या यशानंतर ‘Scam 2003 The Telgi Story’ प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हा’ अभिनेता दिसणार तेलगीच्या भूमिकेत
📷| Ranveer Singh spotted today in
— Ranveer Singh TBT (@Ranveertbt) May 22, 2022
Cannes💙 pic.twitter.com/Q6Ghoh2vgM
रणवीरच्या खतरनाक स्टाइलने तो पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी हजारो कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे. एका युझरने म्हटलंय, ‘काय चड्डी बनियन घालून फिरतोय’. तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘झालं रणवीरने एअरपोर्टवरही घरचेच कपडे घातले’. तर काहींनी म्हटलंय, ‘अरे वा रणवीरचं नवे कपडे जास्तच ट्रेंडी आहेत’ तसेच काहींनी ‘पूर्ण आंघोळ तरी करायची, अर्ध्यातूनच परत आलास’, ‘जोकर’, अशा कमेंट करत त्यांची खिल्ली देखील उडवली आहे. रणवीर सिंह काही दिवसांपूर्वी ‘जयेशभाई जोरदार’च्या प्रमोशनवेळी गुजराती स्टाइलमध्ये सर्वांसमोर आला होता. रणवीरच्या गुजराती लुकवरुन त्याला प्रश्न विचारण्यात आला की, ‘गुजरातीत ओव्हर स्मॉर्टला काय म्हणतात?’ त्यावर उत्तर देत तो म्हणला, ‘चपली. मी तुमच्या भाभीला ही चपलीच बोलतो’. रणवीरच्या या उत्तराने एकच हशा पिकला होता. दीपिकाविषयी बोलायचं झालं तर दीपिकाने कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी स्मोकिंग HAWT लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच Louis Vuittonमध्ये स्ट्रॅपी रेड गाऊन घातला होता. दीपिकाच्या कान्स फेस्टिव्हलमधील लुकमुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं.