मुंबई, 06 डिसेंबर: 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) फेम ओम राऊत (Om Raut) आता 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नाही, पण हा चित्रपट त्यापूर्वीच वादात सापडला आहे. यामध्ये भगवान रामांची भूमिका बाहुबली 'प्रभास' (Prabhas), सीतेच्या भूमिकेत कृती सॅनन (Kriti Sanon) आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan) दिसणार आहे.रावण अर्थात लंकेश या भूमिकेबाबत बोलताना सैफ अली खानने केलेलं वक्तव्य त्याला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
'हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही'
भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी सैफ अली खानवर जोरदार टिका केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'आदिपुरुष नावाच्या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारत आहेत. यामध्ये सैफ अली खान म्हणत आहेत की ते रावणाच्या भूमिकेला हिरोप्रमाणे प्रस्तुत करतील. ते म्हणत आहेत की, लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याने त्या बदल्याच्या भावनेतून रावणाने माँ सीतेचं हरण केलं, प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध केलं. या घटनेला ते न्याय देणार आहेत. सैफ अली खान याचं समर्थन करत असतील, तर याचं समर्थन कसं होईल?' हा सवाल उपस्थित करत राम कदम पुढे म्हणाले आहेत की, 'प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे. ते अधर्माला उचित सिद्ध करत आहेत. आमच्या आस्था आणि श्रद्धेशी कोणी खेळू शकत नाही.'
अभिनेता #सैफअलीखान आदिपुरुष नाम की फ़िल्म में रावण की भूमिका निभाने वाले है । सैफ अली खान , रावण के रोल को हीरो की तरह पेश करेंने की बात करते है रावण के दुष्कृत्य को कृत्य को फ़िल्म के जरिए न्याय देंगे ?यह कैसे संभव है ?
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) December 6, 2020
(हे वाचा-‘दिल जीत’ लिया जी ! आंदोलनातील शेतकऱ्यांना दिलजीत दोसांझची 1 कोटीची मदत)
राम कदम यांनी यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला 'तान्हाजी-द अनसंग वॉरियर' या सिनेमाची देखील आठवण करून दिली. राम कदम म्हणाले की, 'जे हा सिनेमा बनवत आहेत, ओम राऊतजी, त्यांनी याआधी तान्हाजी हा सिनेमा बनवला होता. त्यामध्ये ज्याप्रकारे हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे या सिनेमातही त्यांना हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेचा सन्मान त्यांना करावा लागेल. हिंदू भावना दुखावल्या गेल्यास ते सहन केले जाणार नाही.'
Director @OmRaut you made #Tanhaji which was well received worldwide bcz it does justice to Hindu pride and Marathi asmita. But if #Adhipurush plans to show Ravan in positive light and justify the inhuman act of abduction of Sita Maa,
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) December 6, 2020
काय म्हणाला सैफ?
अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने 'आदिपुरुष' मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. तो म्हणाला, ' एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीतेच्या अपहरणानंतर झालेली रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती.
(हे वाचा-शिल्पा शेट्टीने थाटलं आलिशान हॉटेल; पाहा ‘बॅस्टियन’चे INSIDE PHOTOS)
सोशल मीडिय़ावरही नाराजी
मुलाखतीतील सैफच्या वक्तव्यामुळे लोक भडकले आहे. रावणाने सीतेचं केलेल्या अपहरणाचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित करीत आहे. यानंतर #BoycottAdipurush आणि #WakeUpOmRaut ट्विट करीत चित्रपटावर बहिष्कार घालत आहेत. अनेकांनी सैफ अली खानला चित्रपटातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. अद्याप चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झालेलं नाही, मात्र 11 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे.