मुंबई, 05 डिसेंबर: सध्या दिल्लीजवळ सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनालाच्या पाठिशी अनेक कलाकार उभे राहिलेले आहेत. पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) आंदोलनासाठी घरदार सोडून रस्त्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 कोटीची मदत दिली आहे. एवढंच नाही तर त्याने शेतकऱ्यांच्या मदतीला जात थेट सिंधू सीमा (हरियाणा-दिल्ली सीमा) गाठली असून तिथे त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला.
माणुसकी जपणारा कलाकार
सध्या त्या परिसरात प्रचंड थंडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी त्याने दान केलेल्या पैशातून शेतकऱ्यांसाठी उबदार कपडे विकत घेतले जाणार आहेत.
काय म्हणाला दिलजीत ?
आंदोलनस्थळी पोहोचलेल्या दिलजीतने शेतकऱ्यांचं कौतुक केलं.तसंच दिलजीत म्हणाला, 'आमची केंद्राला फक्त एकच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सर्व लोक इथे शांततेत बसले आहेत आणि संपूर्ण देश शेतकर्यांच्या पाठीशी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, शेतकऱ्यांनी इतिहास रचला आहे.'
Hats off to all of you, farmers have created a new history. This history would be narrated to future generations. Farmers' issues shouldn't be diverted by anyone: Singer-Actor Diljit Dosanjh addressing protesting farmers at Singhu border https://t.co/NrXfCAyBdI pic.twitter.com/u8w7v5w2r9
— ANI (@ANI) December 5, 2020
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीतमध्ये ट्वीटरवॉर चांगलंच रंगलं होतं. दिलजीतनं कंगना रणौतवर टीका करताच कंगनानं त्याला करण जोहरचं (Karan Johar) पालतू असं म्हटलं. यानंतर दिलजीतनं ट्वीट करत कंगनाला तिच्यात भाषेत उत्तर दिलं. दिलजीत म्हणाला, "तू जितक्या लोकांसोबत काम केलं त्या सर्वांची ती पालतू आहे...? मग तर तुझ्या मालकांची मोठी यादी असेल...? खोटं बोलून लोकांना भडकवणं आणि भावनांशी खेळणं तर तुला चांगलंच माहिती आहे. त्यांची अनेक ट्वीट व्हायरल झाली होती. दिलजीतच्या आणि कंगनाच्या ट्वीटवर वॉरनंतर तसंच तिने केलेल्या मदतीनंतर दिलजीतच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्याला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे.