

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आपले आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. शिल्पा शेट्टीने बांद्रा इथं एक नवं हॉटेल सुरू केलं आहे. शिल्पाने तिच्या नव्या हॉटेलचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


शिल्पा शेट्टीच्या हॉटेलला रितेश देशमुख (Ritesh Deshmukh), जेनेलिया देशमुख यांनीही भेट दिली आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.


तिचं हे हॉटेल प्रसिद्ध हॉटेल चेनच्या (famous hotel chain) बॅस्टियनचा (Bastian) भाग आहे. बॅस्टियन हॉटेल बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजमध्ये (Bollywood celebrities) प्रचंड लोकप्रिय आहे.


शिल्पा शेट्टीने तिच्या मैत्रिणींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यात त्या तिघी तिच्या हॉटेलमध्ये दिसत आहेत.


शिल्पा शेट्टी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच आता ती उद्योजिकाही बनली आहे. तसंच ती फिटनेसच्या बाबतीतही अतिशय जागृक असते.


शिल्पा शेट्टी लवकरच हंगामा 2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल, प्रणीता सुभाष आणि मीनाज जाफरी मुख्य भूमिकांमध्ये आहेत. याचे दिग्दर्शन प्रियदर्शन करणार आहेत.