मुंबई, 31 डिसेंबर : आपल्या आउट ऑफ द बॉक्स आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद लोकांना थक्क करण्याची एकही संधी सोडत नाही. प्रत्येक वेळी ती असं काहीतरी हटके घालून येते की सगळ्यांनाच थक्क करते. उर्फी जावेद आपल्या नवनवीन स्टाईलने दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन लूक पोस्ट करत असते. अभिनेत्रीचे चाहते तिच्या नवीन फोटो आणि व्हिडिओंची वाट बघत असतात. अशातच उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेदने नुकताच तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचा फोटो शेअर केलाय. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चेहऱ्याचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत आहेत आणि तिचा चेहरा सुजलेला आहे. फोटो बघून उर्फी जावेदला कोणीतरी मारल्याचं वाटतंय. अभिनेत्रीच्या चेहऱ्याची वाईट अवस्था पाहून तिचे चाहते घाबरले आहेत.
उर्फीने व्हिडीओ शेअर करत तिच्या चेहऱ्याला नक्की काय झालंय याविषयी सांगितलं. उर्फी म्हणाली, ‘म्हणून मी काल मेकसोबत चेहरा लपवला. मला माझा अभिमान आहे. नाही, नाही. मला कोणी मारले नाही. मी अंडर आय फिलर्स केले होते आणि नंतर ही दुखापत झाली. अशी कोणतीही अंडर आय क्रीम नाही जी तुमची काळी वर्तुळे दूर करू शकते. हा सगळा स्रॅम आहे.’
दरम्यान, कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते. हटके अंदाज फॅशन दाखवत ती आत्मविश्वासानं मीडियासमोर येते. अतरंगी आणि बोल्ड ड्रेसिंगवरुन उर्फीला कायमच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे ती सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय असते. उर्फीची स्टाईल, तिचा बोल्ड अंदाज तिला कायम अडचणींत आणत असतो.