Home /News /entertainment /

'सुशांत स्वतःच्या मर्जीने काहीच करू शकत नव्हता...' जवळच्या मित्राचा रियावर आरोप

'सुशांत स्वतःच्या मर्जीने काहीच करू शकत नव्हता...' जवळच्या मित्राचा रियावर आरोप

सुशांतने त्याच्या मित्राला अशी माहिती दिली होती की, रिया त्याचा फोन चेक करते आणि तो स्वत:च्या मर्जीने काही करू शकत नव्हता. बिहार पोलिसांंच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

    आशिष सिंह, मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Demise) प्रकरणी बिहार पोलीस वेगाने तपास करत आहेत. बिहार पोलिसांचा स्वतंत्रपणे तपास सुरू आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आणि त्याचा जुना स्टाफ मेंबर असणाऱ्याने बिहार पोलिसांना अशी माहिती दिली आहे की, त्याने सुशांतला घरच्यांशी बातचीत करण्यास सांगितले होते. पण सुशांतने त्याला अशी माहिती दिली होती की, रिया (Rhea Chakraborty) त्याचा फोन चेक करते आणि तो स्वत:च्या मर्जीने काही करू शकत नव्हता. बिहार पोलीस सुशांतच्या या मित्राला-ज्याचे नाव सुशांतच्या वडिलांनी एक सुशांतचा जवळचा मित्र म्हणून एफआयआरमध्ये नमुद केले आहे-तो या प्रकरणात बिहार पोलिसांचा मुख्य साक्षीदार बनू शकतो. रियावरील आरोपांच्या प्रकरणात तो साक्षीदार बनू शकतो आणि सुशांतच्या मृत्यूनंतक घटनास्थळी पोहोचणारा देखील तो मुख्य साक्षीदार आहे. 'रियाने त्याचा पूर्ण स्टाफ बदलला...' सुशांत त्याच्या मर्जीने काहीच करू शकत नव्हता, अशी माहिती या मित्राने पोलिसांना दिली आहे. तो पुढे म्हणाला की, 'त्याची (सुशांतची) अशी इच्छा नव्हती की त्याची टीम बदलली जावी. मात्र रिया आणि तिच्या आईने संपूर्ण स्टाफ बदलला. सुशांतला हे आवडले नव्हते.' (हे वाचा-सुशांत मृत्यू प्रकरणातील तपास प्रकरणात फडणवीसांची उडी, EDने लक्ष घालण्याची मागणी) सूत्रांच्या माहितीनुसार सुुशांतच्या जवळच्या मित्राने चौकशीमध्ये असे सांगितले की सुशांत त्याच्या जवळ असे म्हणाला होता की, 'मी कुठेही बाहेर गेलो तरी यांना (रियाच्या टीमला) माहित होऊन जाते. ज्यामुळे माझे सर्व काम संपुष्टात येत आहे.' या मित्राने अशी देखील माहिती दिली की, सुशांत त्याचा मित्रांशी आणि बहिणींशी बोलल्यानंतर प्रत्येकवेळी त्याचा फोन रिसेट करत असे. रियाने रिसेट होण्याबद्दल विचारल्यानंतर त्याने तिला मोबाइल खराब झाल्याचे सांगितले होते. (हे वाचा-डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं, जिम ट्रेनरचा मोठा खुलासा) या मित्राने दिलेल्या जबाबानुसार बिहार पोलीस या माहितीपर्यंत पोहोचले आहेत की, रिया ठरवत असे की सुशांत कुणाशी बातचीत करेल आणि कुणाशी नाही. या जबाबनंतर आणखी समोर आलेली माहिती म्हणजे, रियाला सुशांतचा फोन खराब झाल्याचे कळताच चार दिवसानंतर सुशांतच्या क्रेडिट कार्डवरून 3 फोन मागवण्यात आले होते. त्यातील एक सुशांतला देण्यात आला तर इतर दोन रियाकडेच होते. त्याचप्रमाणे रियाने तिची जवळची व्यक्ती असणाऱ्या सॅम्युअल मिरिंडाकडून 4 नवीन सिमकार्ड इश्यू करून सुशांतचा पोन नंबर देखील बदलला होता. या मित्राने दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या नंबर वेळोवेळी बदलला जायचा जेणेकरून त्याला त्याच्या जवळते व्यक्ती संपर्क करु शकणार नाही. अंकिता लोखंडे आणि मितू सिंहचही चौकशी आतापर्यंत या प्रकरणाात सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, त्याची बहिण मितू सिंह आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी या महत्त्वाच्या लोकांची चौकशी झाली आहे. दरम्यान इतरही काही लोकांची चौकशी बिहार पोलिसांकडून सुरू आहे. अंकिताने अशी माहिती दिली होती की शांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता. आणि ही गोष्ट स्वत: सुशांतने आपल्या वाढदिवशी अंकिताला सांगितली होती. (हे वाचा-रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी करायची ब्लॅक मॅजिक,बहिणीची धक्कादायक माहिती) तर बहिण मितू सिंहने देखील रियावर विविध आरोप केले आहेत. तिने अशी माहिती दिली होती की,  सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत असते. ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या नोकराने सांगितली होती. आत्महत्येच्या दोन दिवस आधी दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती देखील तिने दिली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या