मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूप्रकरणी पाटणा पोलीस आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. प्रकरणी वेगाने सूत्र हलवण्यात येत आहेत. पाटणा पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागे दोरे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान बुधवारी सुशांत सिंह राजपूतची बहिण मितू सिंह हिची पाटणा पोलिसांनी जवळपास 4 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची बहिण मितू सिंहची 4 तास चौकशी झाली. दरम्यान यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाटणा पोलिसांनी गोरेगाव याठिकाणी एका अज्ञात ठिकाणी मितू सिंहचे स्टेटमेंट घेतले होते. यामध्ये मितूने सर्वात आश्चर्यकारक बाब सांगितली ती म्हणजे, सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत असते. ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या नोकराने सांगितली होती.
मितू सिंहने पाटणा पोलिसांना अशी माहिती देखील दिली होती की, सुशांत आणि रियामध्ये सुशांतच्या आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वी भांडण देखील झाले होते.
(हे वाचा-डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं, जिम ट्रेनरचा मोठा खुलासा)
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील बिहार पोलिसांसमोर काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले की सुशांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता. आणि ही गोष्ट स्वत: सुशांतने आपल्या वाढदिवशी अंकिताला सांगितली होती. अंकिताने सुशांतसोबत झालेल्या WhatsApp चॅटही पोलिसांना सुपूर्द केले आहे. रियाला सुशांतने अंकितासोबत संपर्कात राहणे आवडत नव्हत. ब्रेकअपनंतरही अंकिता सुशांतच्या संपर्कात होती. मात्र ही गोष्टी रियाला आवडत नव्हती.
(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूप्रकरणी जवळच्या मित्राची होऊ शकते तिसऱ्यांदा चौकशी)
अंकिताने बिहार पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, तिने सुशांतची बहिण श्वेता सिंहला असे सांगितले होते की, मणिकर्णिकाच्या प्रमोशन दरम्यान सुशांतने तिला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. या दरम्यान 2018 मध्ये त्यांच्यात बरीच बातचीत देखील झाली होती. त्यावेळी भावुक होऊन त्याने तिला सांगितले होते ती, तो त्याच्या रिलेशीपमध्ये कंटाळला आहे. त्याला हे नाते संपवायचे होते कारण रिया त्याला खूप त्रास देत होती. हे चॅट तिने सुशांतच्या परिवाराला देखील दिल्याची माहिती मिळते आहे. बिहार पोलीस याच आधारे काही माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात आहेत.
(हे वाचा-रियाला नकोय बिहारमध्ये चौकशी, सुप्रीम कोर्टात म्हणाली मुंबईचे पोलीसच निष्पक्ष)
सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता दोन वेळा पाटणा येथे त्याच्या घरी जाऊन आली होती. श्वेता आणि तिचे संबंध चांगले असल्याने तिने तिची भेट देखील घेतली होती. अंकिताने अशी माहिती दिली की, ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये चांगले संबंध होते. मात्र रियाला दोघांमध्ये संपर्क असणे पसंत नव्हते.
अंकिता, मितू सिंह यांचे जबाब, सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली एफआयआर यासर्व गोष्टींमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात तक्रारीचा सुर पाहायला मिळत आहे. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सांगत रियाने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडेच केस ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. बिहार सरकारने मात्र रियाच्या या याचिकेला विरोध करण्यासाठी मुकुल रोहतगींसारखे तगडे वकील सुप्रीम कोर्टात उभे केले आहेत. मुंबई पोलीसच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास करू शकतात, असं म्हणत रिया चक्रवर्तीने बिहारमध्ये केस जायला विरोध केला आहे.