डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं, जिम ट्रेनरचा मोठा खुलासा

डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं, जिम ट्रेनरचा मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या जिम ट्रेनरने अशी माहिती दिली की, सुशांत डिसेंबरमध्ये अशी काही औषधे घेत होता की त्याआधी त्याने ती कधी घेतली नव्हती.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) कथित आत्महत्या प्रकरण सध्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. याप्रकरणी गेल्या दीड महिन्यापासून तपास सुरू आगे. मात्र गेल्या तीन दिवसात काही मोठ्या गोष्टी, काही खुलासे समोर आले आहेत. नुकतेच सुशांतच्या जिम ट्रेनरने देखील त्याच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. या ट्रेनरने अशी माहिती दिली की, सुशांत डिसेंबरमध्ये अशी काही औषधे घेत होता की त्याआधी त्याने ती कधी घेतली नव्हती.

सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतक दीड महिन्याने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर काही नवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान सुशांतचा जिम ट्रेनर याने अशी माहिती दिली आहे की, सुशांत सिंह राजपूत डिसेंबर 2019 पासून काही संशयास्पद औषधे घेत होता. ज्यामुळे त्याच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत होता.

(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूप्रकरणी जवळच्या मित्राची होऊ शकते तिसऱ्यांदा चौकशी)

एका मीडिया हाऊसशी केलेल्या चर्चेमध्ये सुशांत सिंह राजपूतचा ट्रेनर सामी अहमद (Sami Ahmed) याने अशी माहिती दिली की, सुशांतने याआधी अशी औषधं कधी घेतली नव्हती. ही औषधे घेतल्यानंत त्याचे हातपाय कापत असत. बऱ्याच काळासाठी तो अस्वस्थ राहू लागला होता. सामीने अशी माहिती दिली की, 'सुशांतने याआधी अशा औषधांचा वापर कधी केला नव्हता. सुशांतने अशी माहिती दिली होती की एक-दोन महिन्यासाठी तो हा औषधांता कोर्स करत आहे. जेव्हा मी त्याला तसे करण्यास मनाई केली तेव्हा तो म्हणाला होता की एकदा कोर्स सुरू केल्यानंतर असे मध्येच सोडू शकत नाही.'

(हे वाचा- रियाला नकोय बिहारमध्ये चौकशी, सुप्रीम कोर्टात म्हणाली मुंबईचे पोलीसच निष्पक्ष)

सामने पुढे अशी माहिती दिली की नैराश्याबरोबरच त्याला डेंग्यू झाला होता.'नोव्हेंबरमध्ये सुशांतने मला सांगितले की पॅरिसहून परतल्यानंतर त्याला डेंग्यू झाला आहे. त्याचप्रमाणे तो डॉक्टरांचे काउंसिलिंग देखील सुरू होते. सुशांतचे वागणे खूप बदलले होते. सुशांत याआधी कधी औषधे घ्यायचा नाही. साधा व्हायरल ताप आला तरी तो औषधं घ्यायचा नाही. या औषधांमुळे तो योग्य पद्धतीने वर्कआउट देखील करू शकत नव्हता.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 31, 2020, 11:08 AM IST

ताज्या बातम्या